भारतीय किसान युनियन , वंचित , जय विदर्भ पार्टी तर्फे शेतकऱ्यांच्या ज्वलंत मुद्द्यावर एस.डी.ओ.काटोल यांना निवेदन सादर

1.

काटोल :- २९ फेब्रुवारी ला वंचित बहुजन आघाडी चे नेते दिगांबर डोंगरे , भारतीय किसान युनियन चे महादेवराव नखाते , प्रा विरेंद्र इंगळे यांच्या नेतृत्त्वात उपविभागीय अधिकारी काटोल, यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात खालील गंभीर संवेदनशील मुद्द्यांचा समावेश होता. 

१५ फेब्रुवारी २०२४ ला रात्री अचानक पाऊस येऊन गहू , चना, संत्रा इ पिके बाधित झाली , सुटलेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानग्रस्त म्हणून घोषित करावे.पावसा बरोबर झालेल्या गारांमुळे संत्राचा उरलेला माल १५ दिवसात खाली येण्याची शक्यता आहे. तलाठी कार्यालयाच्या कक्षेतून , सर्व्हेतून अनेक बाधित नावे सुटली आहे त्याच्या समावेशाबाबत.सप्टेंबर २०२३ चे अतिवृष्टीची दखल घेतली नाही.बीन पीकविमा उरलेल्या ७५ % शेतकऱ्यांना मिळाला नाही.

निवेदनात भारतीय किसान युनियन चे महादेवराव नखाते , वंचित बहुजन आघाडी चे दिगंबर डोंगरे , विवेक गायकवाड , देविदास घायवट सुधाकर कावळे, जय विदर्भ पार्टी चे अरुण परबत , अन्नयग्रस्त शेतकरी मोर्चा चे प्रा वीरेंद्र इंगळे , शेतकरी नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश धोटे , श्याम महानंदे , किसणाजी डफरे , नितीन महाजन , अंगद भैस्वार, उमेश महंत , योगेश सावरकर , शेतकरी संघटनेचे प्रभाकर नांदेकर , मनोहर कौरती , प्रा मदन आरोडे , सुनील धर्मे, पंकज बागडदे , प्रमोद बागडदे , अशोक धर्मे, गौतम फुले इत्यादींचा समावेश होता.