शिवजन्मोत्सवानिमित्त शिव प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न .

*शिवजन्मोत्सवानिमित्त शिव प्रतिष्ठान तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित*
शिवजयंती निमित्त शिव प्रतिष्ठान तसेच डॉ पवार हॉस्पिटल तर्फे तसेच रोटरी ब्लड बँक राहुरी यांच्या सौजन्याने डॉ पवार हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. तालुक्यातून आलेल्या शिवप्रेमींनी शिबिरामध्ये रक्तदान करून शिवजयंती साजरी केली.
कार्यक्रमप्रसंगी शिव प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व शिवप्रेमींना रक्तदान करण्याचे आवाहन केले, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अँड राहुलभैया शेटे, प्रकाश शेलार शिवांकुर पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन नारायण निमसे, अशोक झिंज आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तसेच शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब पवार, उपाध्यक्ष गणेश शेळके, डॉ नरेंद्र इंगळे, ज्योती शेळके, शिल्पा इंगळे, मंगलताई पवार आदी विश्वस्तांची उपस्थिती लाभली. तसेच शिबिराचे नियोजन संस्थेचे सचिव डॉ प्रकाश पवार व डॉ गौरी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. रक्तदान शिबिरासाठी बालाजी क्रिकेट अकॅडमी तसेच शिवांकुर परिवारातील अनेक सदस्य सहभागी झाले होते.
*बालाजी क्रिकेट अकॅडमी (बीसीए)* परिवारातील प्रमोदजी मुथा, डॉ प्रीतम चुत्तर, डॉ विरेश राका, डॉ मयूर चुत्तर, गौरव सुराणा, शुभम चुत्तर, कपिल शेवाळे, आनंद पारख, डॉ प्रतीक चोहान, हर्षजित सुराणा, आशिष बाफना, डॉ प्रकाश पवार आदींनी जगातील *सर्वश्रेष्ठ दान रक्तदान* करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व आपले समाजाप्रती असलेले प्रेम व्यक्त केले. शिबिरामध्ये निश्मा मुथा, डॉ हर्षद चोरडिया, डॉ नाजिम शेख, डॉ रवींद्र तनपुरे, आयान शेख, विशाल शिवाजीराजे गाडे, प्रकाश शेलार, गोविंदा माहेश्वरी आदींनी रक्तदान केले तर डॉ प्रसाद भोसले, सचिन बाचकर, आदित्य नरवडे, मोहिनी गागरे, महिमा दुशिंग, मनीषा शिरसाठ, संकेत भांबळ, विशाल शिंदे, रवी शिर्के आदींनी नियोजनास सहकार्य केले.तसेच कार्यक्रमासाठी डॉ गोपिका तनपुरे, डॉ यश काळे, संकेत नेवासकर यांनी उपस्थित राहून सर्वांचे मनोबल वाढविले.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पवार यांनी तर सूत्रसंचलन डॉ गौरी पवार यांनी केले तर रोटरी ब्लड बँक राहुरी चे सर्व कर्मचारी वृंद व पदाधिकारी यांचे संस्थेचे वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आपण केलेल्या समाजसेवेसाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. माझ्या शब्दाला मान देऊन रक्तदात्यांनी रक्तदान केले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे प्रतिपादन डॉ प्रकाश पवार यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करताना केले.