विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा भूषण चंद्रकांत लबडे यांच्या वाढदिवसानिमित्त शेवगाव येथे मराठा आरक्षण मेळावा.

विनोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा भूषण चंद्रकांत लबडे यांच्या वाढदिवसानिमित्त  शेवगाव येथे मराठा आरक्षण मेळावा.

*मराठा भुषण चंद्रकांत लबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा आरक्षण मेळावा विनोद पाटील यांच्या उपस्थित संपन्न*

मराठा समाजातील बेरोजगारी वाढत आहे मराठा समाजाला आरक्षण व संरक्षणाची गरज आहे कोपर्डी घटनेतून एकत्र झालेल्या मराठा समाजाचे प्रश्न तसेच ऐरणीवर आहेत सरकारमध्ये असणारे मराठा नेत्यांनी मराठा तरूणांचा वापर फक्त झेंडे धरायलाच करायचा का? मराठा आरक्षणाची लढाई आपण जिंकू पण मराठा तरूणांनी आत्महत्या न करता स्वत:चे व्यवसाय निर्माण करावे असे आवाहन मराठा नेते विनोद पाटील यांनी केले

शेवगाव येथे मराठा भुषण चंद्रकांत लबडे यांच्या वाढदिवसानिमित्त मराठा आरक्षण मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन विनोद पाटील बोलत होते याप्रसंगी हभप राम महाराज झिंजुर्के ,स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ,कृषिराज टकले, मराठा भुषण चंद्रकांत लबडे, कोपरगाव शिवसेना नेते प्रमोद लबडे,सुभाष गागरे,स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कराळे,आदिंनी मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाभिमानी मराठा महासंघाचे शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर यांनी केले

यावेळी मराठा भुषण चंद्रकांत लबडे म्हणाले की, १४३ शिअवभिषेक करून शिवरायांचे विचार तरूणंपर्यंत पोहचवले आहे अशीच सेवा शेवटपर्यंत करेल मराठा समाजाला दिशा देईन

स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ,कृषिराज टकले म्हणाले की, मराठ्यांनी तरूण आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहे मराठयांचे राजे संभाजीराजे यांना मराठा समाजाच्या प्रश्नासाठी उपोषण करावे लागते तरी सरकार मराठयांचे प्रश्न सोडवत नाही मराठयांचा अंत सरकारने पाहू नये

या कार्यक्रमास दिपक मोरे पैठण , पैठण शिवसेना तालुकाअध्यक्ष आण्णा लबडे,हभप तुळशीराम लबडे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे, शेवगाव तालुकाध्यक्ष अनिल सुपेकर,प्रसिद्धि प्रमुख अमोल म्हस्के, रावसाहेब कावरे, वसंत डौले,शरद खांदे,सुदाम थोरे, अक्षय खोमणे, प्रशांत लबडे, नारायण लबडे, अतुल बोडखे, प्रदिप जाधव,विनोद ठानगे,अक्षय बोडखे ,पुणे जिल्हा अध्यक्ष कचरु चौधरी,शिवाजी भोसले,डॉ,निरज लांडे,अमोल घोलप,संजय काळे, नगरसेवक महेश फलके, प्रकाश नवथर,प्रविण भिसे,योगेश लांडे,डॉ,अनिल चिकणे, कृष्णा मडके,डॉ,प्रसाद शिंदे,आदि उपस्थित होते