थोर पुरुषांच्या चरित्राचा अभ्यास नसल्याने समाज अधोगती कडे -अभिनेते शरद पोंक्षे .

थोर पुरुषांच्या चरित्राचा अभ्यास नसल्याने समाज अधोगती कडे -अभिनेते शरद पोंक्षे .

थोर पूरुषांच्या चरित्राचा अभ्यास नसल्याने समाज अधोगतीकडे - अभीनेते शरद पोंक्षे

     श्रीरामपूर येथे महाले प्रतिष्ठान संचलित महाले पोद्दार लर्न स्कूल मध्ये शुक्रवारी " स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन " या विषयावर प्रसिद्ध सिने अभिनेते शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते . यावेळी महाले प्रतिष्ठानचे ओम महाले , प्रभात उद्योग समूहाचे किशोर निर्मळ , वर्षा आगाशे , महाले परिवाराचे सदस्य व वीर सावरकरांच्या विचारांवर प्रेम करणारे शेकडो नागरिक उपस्थित होते .

  या प्रसंगी बोलतांना शरद पोंक्षे म्हणाले की समाज वाचन संस्कृती विसरल्याने समाजाच्या नैतिक विचारांचे पतन झाले आहे . व्हाटस अॅपवर येणाऱ्या लेखांच्या मुळाशी न जाता व त्यावर चिकित्सक बुद्धीने विचार नं करता इतरांना तोच लेख घाईने फॉरर्वड करण्याची वृत्ती समाजाला हानिकारक आहे . या मुळे थोर स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी चुकीची माहिती समाज माध्यमांवर प्रसिद्ध होत आहे आणी याचा परिणाम म्हणजे सावरकरांविषयी गैरसमज पसरवण्यात समाजकंटक यशस्वी होत आहे.

    आपल्या संस्कृतीकडे आस्थेने बघण्याची समाजाला गरज आहे .पूर्वीपासून चालत आलेल्या रुढी पंरपरेला वैज्ञानिक द्दष्टीकोनातून समजून घेण्याची गरज आहे आणी यासाठी जूने ग्रंथ , थोर सतपूरुषांचे चरित्र वाचून , समजून घेवून त्याप्रमाणे आचरण करण्याची आज गरज आहे असे ठामपणे सांगितले .

सावरकरांविषयी अनेक सत्य या वेळी त्यांनी आपल्या भाषणातुन मांडले . सावरकरांचे देशाविषयीचे प्रेम व स्वातंत्र चळवळीतील त्यांचे अभूतपूर्व योगदान त्यांनी अधोरेखित केले . सावरकरांनी सोसलेल्या अतोनात यातना व हालअपेष्टा देशप्रेम वाढीस कायम प्रेरीत करतात . 

     या वेळी महाले प्रतिष्ठानच्या वतीने अभिनेते शरद पोंक्षे यांच्या सन्मान करुन गौरव करण्यात आला .