बालाजी देडगाव येथे सोसायटीच्या नूतन संचालक पदी महेशराव कदम यांची निवडीबद्दल माजी विद्यार्थी संघ 2003 कडून सन्मान.

बालाजी देडगाव येथे सोसायटीच्या नूतन संचालक पदी महेशराव कदम यांची निवडीबद्दल  माजी विद्यार्थी संघ 2003 कडून सन्मान.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे नुकत्याच झालेल्या निवडणुकीत बहुमताने विजयी झालेले उमेदवार श्री महेश लक्ष्मणराव कदम यांची सोसायटीच्या संचालक पदी निवड झाल्या बद्दल माजी विद्यार्थी संघ 2003 गृपच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम गृपचे सदस्य भारत औटी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

      या कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री गणेश एडके सर यांनी केले, प्रास्ताविकात त्यांनी माजी विद्यार्थी संघ 2003 हे एक देडगावातील सामाजिक संघटन आहे. आपल्या वर्ग मित्रापैकी कोणीही उल्लेखनीय कार्य केले असेल किंवा नव्याने पदभार स्वीकारला असेल तर आपला वर्गमित्र या नात्याने आपण त्याचा सन्मान केलाच पाहिजे,त्याचे कौतुक केलेच पाहिजे. आपण सर्वांनी व्हाट्सअपच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष भेटून सुसंस्कृत राजकारण जपत महेशला शुभेच्छा दिल्या, ही एक माजी विद्यार्थी संघ 2003 ची गौरवशाली बाब म्हणावी लागेल, असे सांगितले.

   यावेळी भाजपा जिल्हा मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्री हरिभाऊ तागड साहेब व लक्ष्मणराव मुंगसे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चांगल्या कर्तृत्वाचा सन्मान करणं हे माजी विद्यार्थी संघ 2003 चे वैशिष्ट्य आहे . नुक्ताच स्थापन झालेला हा गृप देडगावातील सामाजिक कार्यामध्ये कार्यरत होत आहे .या गृप मधील सर्व सदस्य वेगवेगळ्या पदावर कर्मचारी ,अधिकारी ,राजकीय, सामाजिक क्षेत्रात तसेच आर्दश शेतकरी म्हणून पारंगत आहेत. हा गृप सुसंस्कृत पुरोगामी विचारांचा गृप आहे. माजी विद्यार्थी संघातील श्री महेश लक्ष्मणराव कदम हा अतिशय कष्टाळु, प्रामाणिक, शांत स्वभावाचा असल्याने तो एक गृपचा हिरा आहे, त्यामूळे त्याचा या गृपच्या वतीने शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला.

       या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघ 2003 गृपचे ,संदीप मुंगसे ,बापूसाहेब टकले, सुखदेव तांबे, लक्ष्मणराव चेडे , आबासाहेब हिवाळे तसेच श्री किशोर वांढेकर ,बालाजी दूध डेअरी चेअरमन हरिभाऊ कदम , रामभाऊ मुंगसे गोरख माळी , दादा देवकाते

व माजी विद्यार्थी संघ 2003 चे आदी सदस्य उपस्थित होते.

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार श्री बाबासाहेब कोकरे यांनी मानले.