तालुका काटोल येथील प्रा.आ.केद्र कचारीसांवगा येथे आयोडीन डे निमित्ताने जनजागृती...!!
तालुका प्रतिनिधी:- मयुर कुमरे
BPS Live News Network
काटोल :--- आयोडीन न्युनता विकार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत गावा गावा मध्ये आयोडीन डे चे औचित्य साधुन आयोडीन कमतरतेमुळे होणारे दुष्परिणाम टाळने साठी नुकताच प्रा.आ.केद्र कचारीसांवगा येथे मा.शंशाक व्यवहारे तालुका आरोग्य अधिकारी काटोल, डॉ.कांदबरी ऊंबरहांडे वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली आशा स्वंयमसेवीका , आरोग्य कर्मचारी,CHO यांचे प्रशिक्षण घेन्यात येऊन जनजागृती करन्याबाबत आव्हान करण्यात आले.
आयोडीन हे नैसर्गिक द्रव मानवी जीवनाला अंत्यत आवश्यक आहे.शरीरच्या व मेंदुच्या वाढीसाठी शरीराला आयोडीन पुरवठा होने गरजेचे आहे. बालकांमध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे मतिमंदपणा येऊ शकतो. म्हणून लहान मुले व गर्भवती स्त्रियांना पुरेसे आयोडीन पुरवठा न झाल्यास बालकांमध्ये जन्मत:च शारीरिक व मानसिक दोष उद्भवू शकतात किंवा उपजत मृत्यू किंवा बालमृत्यू देखील घडतात.*आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा विकार होतो*. गलगंडग्रस्त मनुष्य निरोगी माणसाच्या तुलनेत कमी क्रियाशील असल्याचे निदर्शनात आले आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज किमान दीडशे मायक्रोग्राम एवढ्या आयोडीन ची गरज असते नैसर्गिक अवस्थेत आयोडीनचा पुरवठा जमिनीतून किंवा खाण्यातून होत असतो. जर जमिनीतील आयोडीन पुरवठा कमी झाला तर त्यावर उत्पादित केलेल्या पिकामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी असते तसेच अतिवृष्टीमुळे जमिनीतील पिकाच्या पाण्याच्या पाण्यामध्ये आयोडीनचे प्रमाण कमी होते हा धोका टाळण्यासाठी दैनंदिन आहारातून शरीराच्या पोषणाकरिता लागणारा आयोडीनचा पुरवठा मीठ या दैनंदिन वापराच्या पदार्थातून उपलब्ध करून देण्याची पद्धत जगातील सर्व देशांनी अवलंबली आहे. *राष्ट्रीय आयोडीनुसार विकार नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विकनसिल राष्ट्रात आयोडीनयुक्त मिठाचा वापर व्हावा वापर हाच प्रभावी एकमेव उपाय आहे. या काळात आयोडीन भावी होणाऱ्या विकारावर मात करण्यासाठी आयोडीन युक्त मिठाचा खाण्याकरता वापर सर्वत्र वाढविण्या हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य लोकांना आयोडीयुक्त मिठाचे महत्त्व पटवून देण्यासाठी गावागावांमध्ये जनजागृती करण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले.या वेळी तालुकास्तरीय पर्यवेक्षक प्रताप वाडबुधे, आरोग्य निरीक्षक प्रशांत वीरखरे,संदीप काचरे ,एल.एच .व्हि. पुजा चिकराम पदमीनी राव उपस्थित होते.