*अपघाती जिवीतहानी रोखण्यासाठी अभियंत्यांचा कलाकौशल्य प्रयोग*
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्यूज नेटवर्क
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
सोलापूर- हायवेला अपघातामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी अभियंत्याने आपले कला-कौशल्य पणाला लावून रोलिंग बॅरियर चा शोध लावला आहे.
भारतात रोलिंग बॅरियरचा पांडेचेरीनंतरचा दुसरा व महाराष्ट्रातला पहिला प्रयोग केला गेला आहे. हा प्रयोग केगाव - हत्तुर बायपासवर डाव्या बाजूवर लावण्यात आला आहे. सामान्यतः पाहिले गेले तर अपघाती वळणावर जास्त जीवित हानी होते. सध्याच्या काळात पाहिले गेले तर सोलापूर शहरातून वेगवेगळ्या प्रकारचे हायवे गेलेले आहेत.वाहनांची गती सुद्धा साधारणतेपेक्षा जास्त वाढलेली आहे. यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग होणे अत्यंत गरजेचे आहे.
या रोलिंग बेरियरच्या बद्दल सांगायचं म्हणजे हा रोलिंग बॅरियर डिव्हायडर मध्ये पूर्णतः रबरी पासून बनवला गेला आहे. जेणेकरून गाडीचा रोलिंगवर धडकली तर गाडीचेही नुकसान होणार नाही व आदळाचे प्रमाण कमी होईल. हा रोलिंग बॅरियर पूर्णतः गोल फिरतो जेणेकरून गाडी धडकल्यास शक्यतो गाडीला व आतील लोकांना कमी प्रमाणात नुकसान होते. रोलिंग गार्ड रबरा पासून बनवले गेले आहेत. हे रबरी रोलिंग बॅरियर अत्यंत टनक आहे .राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामुळे महाराष्ट्रात प्रथमच हा प्रयोग करण्यात आला आहे.
शक्यतो सर्वत्र सिमेंट व खडीचे डिव्हायडर बेरियर असतात या डिव्हायडरला धडकल्यास गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते व जीवित हानी मोठ्या प्रमाणात होते.त्याकरिता हा नवीन तंत्रज्ञानाचा रबरी रोलिंग बेरियर लावल्याने जीवितहानी होण्याची शक्यता कमी होईल.यापूर्वी भारतात पांडेचेरी येथे याचा पायलट प्रयोग झालेला आहे. अशा प्रकारचे सर्वत्र रबरी रोलिंग बॅरियर बसवल्यास गाडीचे नुकसान व जीवित हानी होण्यापासून निश्चितच फायदा होईल.