लग्नाचे आमिष, ब्लॅकमेल आणि अत्याचार; सहा जणांविरुद्ध सोनई पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल"

लग्नाचे आमिष, ब्लॅकमेल आणि अत्याचार; सहा जणांविरुद्ध सोनई पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल"

:

"लग्नाचे आमिष, ब्लॅकमेल आणि अत्याचार; सहा जणांविरुद्ध सोनई पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल"

 अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी//

नेवासा तालुक्यातील सोनई पोलीस ठाण्यात एका २१ वर्षीय विवाहित महिलेच्या फिर्यादीवरून सहा जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणे, अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणे, धमक्या देणे तसेच इतर आरोपींनीही पीडितेला मानसिक त्रास देत धमकावल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

सोनई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) मधील बलात्कार, विनयभंग, गुन्हेगारी धमकी, मारहाण, अपहरण, कट रचणे व अन्य गंभीर कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. ही घटना सन २०२४ ते २१ जुलै २०२६ या कालावधीत सोनई, नेवासा, अहमदनगर, लोणावळा आणि पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यातआलेआहे.फिर्यादीनुसार, मुख्य आरोपीने पीडितेचे फोटो मोबाईलमध्ये काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध विविध ठिकाणी नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तसेच इतर आरोपींनीही पीडितेला धमकावत मुख्य आरोपीला साथ दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपींकडून पीडितेवर सातत्याने दबाव टाकून तिचे मानसिक व शारीरिक शोषण करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. संबंधित आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांनुसार कारवाई करण्यात येत असून प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

(