आज दि.११.मे २०२२ रोजी ता.राहुरी बार वकिल संघाच्या वतिने ता.राहुरी कोर्टातील न्यायाधीश मॅडम चा निरोप समारंभ

आज दि.११.मे २०२२ रोजी ता.राहुरी बार वकिल संघाच्या वतिने ता.राहुरी कोर्टातील न्यायाधीश मॅडम चा निरोप समारंभ

आज दिनांक ११ मे २०२२ रोजी राहुरी बार वकील संघाच्या वतीने राहुरी कोर्टातील सह दिवाणी न्यायाधीश रा.सू शिंदे मॅडम तसेच सह दिवानी न्यायाधीश माया मथुरे मॅडम यांचा निरोप समारंभ राहुरी वकील संघाच्यावतीने राहुरी कोर्ट या ठिकाणी अतिशय मोठ्या थाटामाटात व सत्कार सोहळ्यात साजरी करण्यात आला सदरच्या निरोप समारंभ प्रसंगी राहुरी वकील संघाचे अध्यक्ष अँड.राहुल शेटे यांनी सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच अँड. प्रसाद कोळसे यांनी प्रस्ताविक केले तसेच अँड. मनिषा लाला पंडित यांनी भाषणामध्ये सह दिवाणी न्यायाधीश रा. सू शिंदे मॅडम तसेच सहदिवाणी न्यायाधीश माया मथुरे मॅडम यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला तसेच राहुरी वकील संघाला केलेल्या कायदेशीर सहकार्याबद्दल शिंदे मॅडम आणि मथुरे मॅडम यांचे आभार मानले तसेच सदरच्या निरोप समारंभ नंतरही शिंदे मॅडम आणि मथुरे मॅडम यांच्या बरोबर राहुरी कोर्टाचे व राहुरी वकील संघाचे असलेले प्रेमाचे नातेसंबंध कधीच संपणार नाही असे प्रतिपादन केले तसेच शिंदे मॅडम आणि मथुरे मॅडम यांना पुढील वाटचालीसाठी , कार्यासाठी शुभेच्छा दिल्या सदरच्या निरोप समारंभ प्रसंगी अँड. ज्ञानदेव तोडमल ,अँड. येवले न्यानेश्वर, अँड.कारभारी ढोकणे , सरकारी वकील अँड.आर के गागरे , अँड. देशमुख अँड. जयश्री घावटे (महिला उपाध्यक्ष) या सर्वांनी मनोगत व्यक्त केले तसेच सह दिवाणी न्यायाधीश रा. सु शिंदे मॅडम व सहदिवाणी न्यायाधीश माया मथुरे मॅडम यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या सदर चा निरोप समारंभा मध्ये सहदिवाणी न्यायाधीश रा.सू शिंदे मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले राहुरी वकील संघाने त्यांना केलेल्या सहकार्याबद्दल सर्वांचे आभार मानले तसेच सह दिवाणी न्यायाधीश माया मथुरे मॅडम यांनी देखील त्यांचे मनोगत व्यक्त करून राहुरी वकील संघाबद्दल आदर व्यक्त केला सदरचा निरोप समारंभ प्रसंगी राहुरी वकील संघातील सर्व पुरुष वकील वर्ग तसेच महिला वकील वर्ग अँड. ज्योती राऊत , अँड. अर्चना मैड , अँड. सुवर्णा कुलकर्णी , अँड. कल्याणी पागिरे, अँड.अनिता तोडमल, अँड शोभा रणवरे यादी सर्व महिला उपस्थित होत्या तसेच इतर सर्व पुरुष वकील वर्ग न्यायालयीन सरकारी कर्मचारी वर्ग व न्यायालयीन कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.