नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील शेतकऱ्याच्या शेळ्या चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यां विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल .

नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथील  शेतकऱ्याच्या शेळ्या चोरणाऱ्या अज्ञात चोरट्यां विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल .

                  

अहमदनगर  जिल्हा प्रतिनिधी//संभाजी शिंदे

नेवासा तालुक्यातील शिरेगाव येथिल शेतकरी संभाजी भास्कर जाधव (वय -46 ) यांच्या राहत्या घराशेजारील शेडमधील दोन शेळ्या व दोन बकरे कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे .

पाळीव जनावरांचे रक्षण नक्की कोणापासून करायचे असा प्रश्न सद्ध्या पशुपालकासमोर उपस्थित झाला आहे . सद्ध्या गावागावात वाघ,, बिबटे आणि चोर यांनी थैमान घातले आहे . वाघ, बिबटे शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ले करत आहेत आणि चोरटे शेतकऱ्यांच्या मोटारी, शेळ्या, बकरे चोरण्याचे काम करत असल्याने शेतकरी वैतागलेल्या अवस्थेत जीवन जगत आहे .दिनांक 28/03/2024 रोजी रात्री सुमारे 3 वाजेच्या सुमारास दोन शेळ्या व दोन बकरे चोराने चोरून नेल्याची तक्रार संभाजी जाधव यांनी पोलिसात दाखल केली आहे .

       यापूर्वीही खेडले परमानंद शिवारातील इनामदार वस्ती , सोनई रस्त्यालगत बनकर वस्ती  अशा ठिकाणी हे प्रकार घडून आलेले आहेत .परंतु तक्रार दाखल न केल्यामुळे चोरांना मोकळे रान सापडले आहे.