पिंप्री अवघड जिल्हा परिषद शाळेत नवनिर्वाचित सरपंच सौ. मिनाक्षीताई लांबे यांचा सत्कार व बदली झालेल्या शिक्षकांना निरोप व नविन शिकांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न .

पिंप्री अवघड जिल्हा परिषद शाळेत नवनिर्वाचित सरपंच सौ. मिनाक्षीताई लांबे यांचा सत्कार व बदली झालेल्या शिक्षकांना निरोप व नविन शिकांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न .

पिंप्री अवघड जिल्हा परिषद शाळेत नवनिर्वाचित सरपंच मिनाक्षीताई लांबे यांचा सत्कार व बदली झालेल्या शिक्षकांचा निरोप व स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न.

            पिंप्री अवघड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या मिनाक्षीताई लांबे यांचा शाल व पुष्पगुच्छ व साडी देऊन भव्य सत्कार पिंप्री अवघड ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या नुकत्याच जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदली प्रक्रियेत पिंप्री अवघड जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक अनिल कल्हापुरे, शिवाजी नवाळे व संगिता बेदरे यांच्या बदल्या झाल्या असून शाळेत त्यांच्या जागेवर कल्पना मेहेत्रे, शिवाजी कुलट व अर्चना पोटघन ढोकणे हे शिक्षक बदलीने हजर झाले आहेत. 

            पिंप्री अवघड शाळेतून बदली होऊन गेलेले शिक्षक व नव्याने हजर झालेले शिक्षक यांच्या निरोपाचा व स्वागताचा भव्य कार्यक्रम पिंप्री अवघड ग्रामस्थांकडून शाळेत आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी बदली होऊन गेलेले शिक्षक अनिल कल्हापुरे, शिवाजी नवाळे, संगिता बेदरे यांचा त्यांनी पिंप्री अवघड शाळेसाठी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून शाल, पुष्पगुच्छ व पाची पोशाख तसेच साडी देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच शाळेत नव्याने बदली होऊन आलेले शिक्षक कल्पना मेहेत्रे, शिवाजी कुलट व अर्चना पोटघन/ढोकणे यांचा ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून कडून शाल, पुष्पगुच्छ व पाची पोशाख तसेच साडी देऊन भव्य स्वागत करण्यात आले. 

           या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच तथा प्रहार संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेश पाटील लांबे होते. याप्रसंगी पिंप्री अवघड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच सौ.मिनाक्षीताई सुरेश लांबे, उपसरपंच बापूसाहेब तमनर, पिंप्री अवघड सोसायटीचे चेअरमन मच्छिंद्र पाटील लांबे, पिंप्री अवघड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जालिंदर पवार, उपाध्यक्ष सौ.सुवर्णा ललित गायकवाड तसेच ग्रामपंचायत सदस्य शिवाजी लांबे, परविनबानो बादशाह शेख, राहुरी खुर्दचे कामगार तलाठी तुषार काळे, ग्रामपंचायत ग्रामसेवक श्रीम.शुभांगी चोखर, माजी सरपंच अनिल दोंड,बादशहाभाई शेख,रमेश दोंड,अरुण लांबे,महेंद्र लांबे,सुरेश (गोपी) लांबे,अंतवान गायकवाड,राजू लांबे,सोपान लांबे, एकनाथ लांबे,दादासाहेब लांबे,दगडू शेख,राजेंद्र लांबे,बाबासाहेब विरकर, चंद्रकला लांबे, अश्विनी लांबे, योगिता लांबे शकुंतला गायकवाड, पिंप्री अवघड शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर जवरे व शिक्षक मच्छिंद्र नागटिळक,अनिल कल्हापुरे, कल्पना मेहेत्रे,शिवाजी नवाळे,अर्चना पोटघन,शिवाजी कुलट, अनिल पवार, संगिता बेदरे, ज्योती पुरी,छाया पानसरे आदी उपस्थित होते. 

           कार्यक्रम प्रसंगी उपसरपंच बापूसाहेब तमनर, कामगार तलाठी तुषार काळे व अध्यक्ष सुरेश पाटील लांबे आणि बदली झालेले शिक्षक अनिल कल्हापुरे, शिवाजी नवाळे व संगिता बेदरे यांनी शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा थोडक्यात उल्लेख आपल्या मनोगतात व्यक्त केला. बदली होऊन शाळेत नव्याने हजर झालेल्या शिक्षकांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात अर्चना पोटघन/ढोकणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गंगाधर जवरे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले व आभार मच्छिंद्र नागटिळक यांनी मानले.