यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा अद्वितीय उपक्रम,विश्वप्रार्थना पसायदान आता अर्थासहित शाळा महाविद्यालयात.

यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचा अद्वितीय उपक्रम,विश्वप्रार्थना पसायदान आता अर्थासहित शाळा महाविद्यालयात.

प्रतिनिधी संभाजी शिंदे

पसायदान विश्व प्रार्थना शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यत अर्थासह पोहचविण्याचा यशवंत प्रतिष्ठानचा उपक्रम कौतुकास्पद.

ह भ प उद्धव महाराज नेवासेकर.

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने नेवासा तालुक्यातील शाळा ,महाविद्यालयांना पसायदान भित्तीपत्रिका वाटप.

प्रतिनिधी

विश्व प्रार्थना म्हणून संबोधले गेलेल्या व ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासा येथे ज्ञानेश्वरी ग्रँथाच्या निर्मिती प्रसंगी तयार केलेले पसायदान शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अर्थासह शाळेतच उपलब्ध व्हावे यासाठी आ शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या संकल्पनेतून यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने पसायदान भित्तीचित्रिका अनावरण व विद्यालयांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते व युवा नेते उदयन गडाख उपाध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या प्रमुख उपस्थिती शनी दि 3 सप्टेंबर 2022 रोजी श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे संपन्न झाले.

याप्रसंगी बोलतांना युवा नेते उदयन गडाख म्हणाले संपूर्ण जगाची विश्व प्रार्थना असलेले पसायदानाची निर्मिती ज्ञानेश्वर माऊलींनी नेवासा येथे केली आहे ही नेवासकरांसाठी विशेष अभीमानाची बाब आहे.

नवीन पिढीला पसायदान अर्थासहीत माहिती व्हावे यासाठी पसायदान भित्तीपत्रिका यांचे वाटप उद्धव महाराज मंडलिक यांच्या आशिर्वादाने करत आहोत यापुढेही नेहमी यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने सामाजिक,शैक्षणिक ,क्रीडा ,

संस्कृतीक उपक्रम राबविण्यासाठी तत्पर राहू उपक्रमात आपण सर्वांनी सहभागी होऊन उपक्रम यशस्वी करावे असे आवाहन उदयन गडाख यांनी केले.

याप्रसंगी बोलतांना ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर म्हणाले की मा खा यशवंतराव गडाख,आ शंकरराव गडाख,प्रशांत गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उदयन गडाख नेवासा तालुक्यात सक्रिय पणे सामाजिक उपक्रम राबवतात ही बाब स्वागतार्ह व कौतुकास्पद आहे.एका कार्यक्रमप्रसंगी मी तालुक्यातील शाळांमध्ये पसायदान आर्थसह उपलब्ध झाले तर भावी पिढ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी हातभार लागेलं व पसायदान काय आहे हे सर्वांना समजेल अशी संकल्पना युवा नेते उदयन गडाख यांचे कडे मांडली त्यांनी तत्काळ स्वतः लक्ष घालत यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने पसायदान भित्तीपत्रिका तयार केल्या व त्यांचे वाटप आज करण्यात येत आहे ही अभिनंदनिय बाब आहे.नेवासा महाविद्यालयात उदयन गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व 

विद्यार्थिनीसाठी व्यक्तिमत्त्व विकासाचे उपक्रम राबविले जातात ते स्वागतार्ह आहेत.मुलींचे विशेष ढोल पथक तयार करून मुलींना स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे ही बाब कौतुकास्पद आहे.

तसेच पसायदानाचा अर्थ ह भ प उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी याप्रसंगी सर्वांना समजावून सांगितला व प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले.याप्रसंगी यशवंत स्पोर्ट्स क्लब नेवासा येथील राष्ट्रीय स्तरांवर विशेष प्राविण्य मिळवलेल्या कु रक्षा खेनवर,कु राधिका हेडे, कु ऋतुजा कुंभार,कु प्रणिता रोडे,कु तनुश्री बिडवई,कु निरल मांदळे यांचा व प्रशिक्षक पापा शेख यांचा उद्धव महाराज मंडलिक व उदयन गडाख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी न्यु इंग्लिश स्कुल कुकाना,न्यु इंग्लिश स्कुल पाथरवाला, न्यु इंग्लिश स्कुल सलाबतपुर,अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय देडगाव,श्री शनिश्वर माध्यमिक विद्यालय सोनई,स्वामी विवेकानंद विद्यालय मोरयाचिंचोरे यांना प्रतिनिधी स्वरूपात भित्तीपत्रिका वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा यांनी केले याप्रसंगी कु राधिका हेडे या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले याप्रसंगी 

नंदकुमार पाटील मा उपनगराध्यक्ष, लक्ष्मण जगताप उपनगराध्यक्ष,राजेंद्र उंदरे,फारूक आतार,जितेंद्र कु-हे,विधिज्ञ लक्ष्मण घावटे,राम केंदळे, आशिष कावरे,जालु गवळी,विधिज्ञ रोहित जोशी,गणेश कोरेकर ,सचिव उत्तमराव लोंढे,सहसचिव डॉ विनायक देशमुख,डॉ अशोक तुवर,व्यंकटेश बेल्हेकर, आदींसह यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.पासायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

नेवासा येथे पसायदान भित्तीपत्रिकांचे विद्यालयास वाटप करतांना उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर व युवा नेते उदयन गडाख व मान्यवर उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना पसायदान अर्थासह माहिती व्हावे यासाठी विविध शाळा महाविद्यालये व ग्रामविकासाचे मंदिर असलेल्या नेवासा तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीस यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने पसायदान भित्तीपत्रिका वाटप करण्यात येणार आहे.