राहुरी येथील शेतकऱ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानां लेखी स्वरूपात पत्र लिहून पाठवले
बिबट्यांच्या दहशतीविरोधात राहुरीतील नागरिक आक्रमक
राहुरी ता प्रती -

डॉ देवेंद्र शिंदे
हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवले.वन्यजीव संरक्षण कायद्यात बदलासाठी माजी मंत्री तनपुरे आक्रमक
राहुरी तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्यांचे वाढत असलेले हल्ले व त्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये बदल करण्याबाबत राहुरी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लेखी पत्र पाठवले आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवार, दि.२४ फेब्रुवारी २०२६ रोजी हजारो शेतकऱ्यांनी राहुरी येथील मुख्य पोस्ट कार्यालयात जाऊन हे पत्र दिले आहे .
महाराष्ट्र राज्यात व विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. या
जिल्ह्यातील बहुतांश तालुके बागायती
असून या हे ठिकाणी ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे बिबट्यांना लपण्यासाठी सातत्याने जागा उपलब्ध होते. परंतु ऊसाची तोड सुरू झाल्यानंतर त्यांचा मानवी वस्तीमधील वावर वाढत आहे. परिणामी मानवावर हल्ले होऊन मनुष्यहानी होण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून बिबट्यांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झालेला आहे. बिबट्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी रात्रीच्या वेळेस शेतीला पाणी देण्यास टाळाटाळ
करीत आहेत. राज्य मार्गावर आहे. शासनाकडून नाही. वास्तविक बिबट्याचा प्रश्न
महिन्यात १५ दिवस शेतीकरिता रात्रीचा वीज पुरवठा होत आहे. यामुळे शेतीक्षेत्र उद्धवस्त होण्याच्या याकरिता बिबट्यांचे स्थलांतर करणे, त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी मादी बिबट्यांची नसबंदी करणे व इतर उपाययोजना करणे आवश्यक आहे. परंतु केंद्र शासनाने संमत केलेल्या वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे या उपाययोजनांवर मर्यादा येत आहेत. याकरिता या कायद्यामध्येच काही मूलभूत बदल करणे आवश्यक आहे. याबाबत मागील आठ-दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत आवाज उठवला होता. त्यास राज्यातील कोणत्याही खासदारांनी समर्थन दिले
संपूर्ण राज्यात सुरू असताना नगर जिल्हा वगळता अन्यत्र त्यास पाहिजे तसे समर्थन मिळत नाही. तनपुरे यांनी दोन महिन्यांपूर्वी या प्रश्नावर तालुक्यातील प्रमुख शेतकऱ्यांची बैठक घेऊन या कायद्यात बदल करण्याबाबत पंतप्रधानांना पत्र पाठविण्याचा निर्णय घेतला होता. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या समर्थनार्थ राहुरी तालुक्यातील शेतकरी व नागरिकांनी स्वतःच्या स्वाक्षरीने पत्र पंतप्रधान मोदी यांना पाठविण्याचा निर्णय घेतला आणि आज ते पत्र पाठवले देखील आहेत . बिबट्यांच्या मानवी वस्तीमधील मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये असलेली प्रचंड दहशत तसेच उद्धवस्त होत असलेले शेतीक्षेत्र यांचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे. वन्यजीव संरक्षण कायदा शिथील करण्यासाठी आवश्यक बदल या कायद्यामध्ये करण्यात यावा, अशी विनंती करणारे पत्र पाठविण्यात आले आहे.








