डिग्रस ग्रामपंचायत कामकाजात मोठा घोटाळा ग्रामसेवक डोंगरे कडून चौकशी अधिकार्याची दिशाभूल ग्रामस्थ पेटून उठले.
डिग्रस ता राहुरी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुरेश लहाणु डोंगरे यांनी ग्रामविकासाची सन २०२० ते२०२२ एकुन ४९ कामे केलेले दाखविण्यात आले मात्र बहुतांश कामे अर्धवट करण्यात आली दलीत वस्ती सुधार योजनेतुन रस्ते कॉक्रीटीकरण व बंधीस्त गटार योजनेची कामे करण्यात आली असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आली गावातील तरुण योगेश चंद्रभान पवार व जयकुमार परशुराम पंडीत यांनी माहीती अधिकारात सदर कामे झाल्याचे कागदपत्रांची मागणी केली होती परंतु सदर ग्रामसेवकाने हि माहिती योगश पवार यांना दिली नाही म्हणुन योगेश पवार यांनी अपील दाखल करून ही कागदपत्रे मिळवीली असता वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला ग्रामसेवक डोंगरे यांनी रामवाडी दलीत वस्ती कंक्रीटीकरण आणी बंदीस्त गटार योजनेची कामे पुर्ण केल्याचे दाखवुन लाखो रुपयाचा अपहार केला म्हणुन योगेश पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचेकडे तक्रार दाखल केली परंतु सदर तक्रारीची दखल घेतली नाही त्यामुळे योगेश पवार व जयकुमार पंडीत हे पंचायत समिती राहुरी कार्यालय आवारात दि. ७ ऑक्टोबर २०२३ पासुन उपोषणास बसले आहेत या उपोषणाची दखल घेत राहुरीचे आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी या कामाच्या चौकशीचे आदेश पंचायत समीती राहुरीच्या अधिकाऱ्यांना दिले सदर चौकशी साठी श्री पाटील उपअभियंता पंचायत समिती राहुरी व श्री शिंदे शाखा अभियंता पंचायत समिती राहुरी हे चौकशी साठी डिग्रस येथे आले असता ग्रामसेवक डोंगरे यांनी डिग्रस गावठान हदीला रामवाडी असल्याचे भासवुन जुनीच गावठाण हद्दीतील कामे चौकशी दरम्यान दाखवली प्रत्यक्ष गावठाण हददीतील लोकांना रामवाडीचे रहीवासी दाखविण्यात आले ह्या कामाची मोजमाप पुस्तके (एम बी ) ज्या शाखा अभियंता शिदे यांनी लीहुण काम पुर्ण केल्याचे दाखवले तेच शाखा अभियंता चौकशी कामी सोबत असल्याने चौकशी अधिकारी . उप अभियंता श्री पाटील यांनी ग्रामसेवकांनी दिलेल्या माहीतीवर विश्वास ठेवला व उपस्थीत तेथे ग्रामस्ताचे काहीही म्हणणे ऐकुन न घेता त्या ठिकाणाहुन निघुन गेले त्या मुळे ही चौकशी एकतर्फा होत असल्याने डिग्रस ग्रामस्त चौकशीवर नाराज झाले असल्याचे दिसुन आले प्रत्यक्षात न झालेली रामवाडी परिसतील कामे ग्रामसेवक डोंगरे यांनी कागदोपत्री दाखवले आणी शाखा अभियंता श्री शिदे यांनी केवळ कार्यालयात बसुन मोजमाप पुस्तीका (एमबी ) लिहून कामे पूर्ण झाल्याचे दाखवले म्हणजेच या गैरकारभारामध्ये श्री शिंदे देखील सहभागी असावेत असा संशय डिग्रस ग्रामस्थांनी व्यक्त केला असुन चौकशी अधिकारी उपअभियंता श्री पटील साहेब हे देखील ह्या गैर कारभारात सामील असतील तर ग्रामसेवक डोंगरे व शाखा अभियंता शिंदे यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतील अशी चर्चा डिग्रस ग्रामस्थांमध्ये होत आहे तरी या न झालेल्या कामाबाबत संबंधीत गावची व शासनाच्या निधीचा अपव्याय केला म्हणून दोशी अधिकार्यावर गुन्हे दाखल करून त्यांचे त्वरित निलंबन करावे हि संबंधीत उपोषण कर्ता रिपब्लीकन सेना राहुरी तालुका उपाध्यक्ष योगेश पवार.
जयकुमार पंडित.व शाम जाधव भिम आर्मी जिल्हा अध्यक्ष व समस्त ग्रामस्थ डिग्रस यांची मागणी आहे.