शेवगाव तालुक्यात वाळू तस्करांचा तलाठ्यावर प्राणघातक हल्ला
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील कामगार तलाठी बाबासाहेब अंधारे यांच्यावर शेवगाव गेवराई महामार्गावर असणाऱ्या सोनेरी फाट्याजवळ असणाऱ्या तीन अज्ञात वाळूतस्करांनी लाकडी दांडक्याने मारहाण व प्राणघातक हल्ला केला असुन त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न देखील केला आहे. त्यादरम्यान ते गंभीर जखमी झाले आहेत सविस्तर माहिती अशी की शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील कामगार बाबासाहेब अंधारे यांना गुप्त खबर यामार्फत बालम टाकळी या गावात वाळूचे ट्रॅक्टर वाळू भरून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली . असता त्यानुसार त्यांनी गावात असलेल्या बालंबिका देवी मंदिराजवळ सदरील ट्रॅक्टर पकडला आणि ते पुढील कारवाईसाठी शेवगाव तहसील कार्यालयात घेऊन येत असताना शेवगाव गेवराई महामार्गावर असणाऱ्या सोनेरी फाट्याजवळ अज्ञात तीन वाळूतस्करांनी सदरील वाळूचा ट्रॅक्टर अडवून त्यांच्यावर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला केला त्यामध्ये त्यांच्या डोक्याला हाताला खांद्याला तसेच पूर्ण शरीरावर जबर मारहाण झाली आहे. तसेच या घटनेत तलाठी अंधारे हे गंभीर जखमी झाले .तर पुढील उपचारासाठी त्यांना अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे.तसेच या घटनास्थळावरून त्या तिघे हल्लेखोरांनी वाळूचा ट्रॅक्टर पळून देखील नेला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील गुप्तवार्ता विभागाचे बप्पासाहेब धाकतोडे पोलीस नाईक संतोष धोत्रे आदींनी ग्रामीण रुग्णालय येथे धाव घेऊन तलाठी बाबासाहेब यांची विचारपूस केली.तसेच नायब तहसीलदार मयुर बेरड मंडळाधिकारी बापूसाहेब खुडे तलाठी संतोष पवार कोतवाल रामजी भोंगळे तलाठी सचिन लोहकरे गणेश वावरे आप्पासाहेब शिंदे सामाजिक कार्यकर्ते भगवान मिसाळ संतोष बानाईत तलाठी संघटनेचे केदार भाऊसाहेब आदींनी देखील ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे धाव घेतली व त्यांना तेथे प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी ॲम्बुलन्स द्वारे अहमदनगर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान वाळू तस्करांच्या मुजोरपणा अधिकाऱ्यांना देखील प्राणघातक ठरू शकतो .