पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा बळेवाडी तर्फे आश्रम शाळेत बार्शी तालुका विभाग प्रमुख श्री उमेश आनेराव यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
बी पी एस राष्ट्रीय लाईव्ह न्युज.
जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे
बार्शी.(ता.बार्शी) - दि.10-03-2022 रोजी श्री समर्थ निवासी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा कासारवाडी रोड बार्शी येथे पोलीस जाणिव सेवा संघाचे बार्शी तालुका विभाग प्रमुख- श्री उमेश आनेराव यांचा वाढदिवस केक, बुके व इतर वस्तु भेट न देता या आश्रम शाळेत 1 ली ते 9 च्या विद्यार्थ्यांना वही, पेन, कंपास व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला.
या शाळेत किमान 230 ते 240 विद्यार्थी आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांनी असे मत मांडले की या शाळेचे मुख्याध्यापक व सर्व गुरुजन सर, मॅडम हे आतिशय चांगल्या प्रकारे शिकवण देऊन सर्वांची काळजी घेत असतात.
तसेच या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बार्शी तालुका पोलीस स्टेशन चे श्री हर्षवर्धन वाघमोडे साहेब.
तसेच बार्शी तालुका विभाग प्रमुख- श्री उमेश आनेराव, उपविभाग प्रमुख- श्री समाधान विधाते, बळेवाडी शाखाप्रमुख तथा बी पी एस लाईव्ह न्युज चॅनल जिल्हा प्रतिनिधी- श्री सम्मेद तरटे, अध्यक्ष- श्री आप्पासाहेब सगरे, कार्याध्यक्ष- श्री गुरुनाथ मोरे, आनंद बोराडे, अजय काकडे, नाना चिकणे, संजय ठोंबरे आदि ग्रामस्थांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
तसेच शाळेचे संचालक अध्यक्ष- सुवर्णा मुकुंद शिंदे/ सचिव-श्री मुकुंद काशिनाथ शिंदे, संभाजी सर्जेराव चौरे (मुख्याध्यापक) मदने सर (क्लार्क), मंडलिक सर, घुले सर, दातार सर, शंकर चौरे सर, ओव्हाळ मॅडम, नलवडे मॅडम, तनपुरे मॅडम, गावडे मॅडम, चव्हाण मॅडम, शिंदे मॅडम व सर्व उपस्थित सेवक वर्ग व विद्यार्थी वर्ग.