कृषी विज्ञान संकुलामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल - कृषिमंत्री मा .ना . श्री . माणिकराव कोकाटे .

कृषी विज्ञान संकुलामुळे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा मिळेल - कृषिमंत्री मा .ना . श्री . माणिकराव कोकाटे .

*कृषि विज्ञान संकुलामुळे महाराष्ट्राच्या कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळेल*

*- कृषि मंत्री मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे*

              शेतकर्यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काष्टी येथे उभारलेल्या कृषि विज्ञान संकुलाचे महत्त्व मोठे आहे. दूरदृष्टी आणि अथक प्रयत्नांमुळे उभ्या राहिलेल्या या कृषि संकुलाने महाराष्ट्राच्या कृषि क्षेत्राला नवी दिशा मिळेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे कृषि मंत्री मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे यांनी केले.

             कृषिमंत्री झाल्यानंतर प्रथमच मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे व शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. दादाजी भुसे यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कार्यरत असलेले व नव्याने सुरू झालेले छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलास भेट देऊन तेथील कामांची पाहणी केली यावेळी ते मार्गदर्शन करतांना मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे बोलत होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुलाचे प्रमुख डॉ. सचिन नांदगुडे, विद्यापीठ अभियंता श्री. मिलिंद ढोके व संकुलातील प्राध्यापक डॉ. सोमनाथ सोनवणे उपस्थित होते.

             यावेळी डॉ. सचिन नांदगुडे यांनी कृषि विज्ञान संकुलातील आधुनिक पायाभूत सुविधा, विविध महाविद्यालये, वसतीगृहे, संशोधन प्रकल्प आणि शेतकर्यांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक व प्रशिक्षण संधी याबद्दल मान्यवरांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मा.ना.श्री. माणिकराव कोकाटे यांनी संकुलाच्या पुढील कामासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी या प्रकल्पाचे ठेकेदार श्री. पवार, श्री. राजेंद्रभैय्या भोसले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिंनी उपस्थित होते.