*काटोल नरखेडात सुपर रेल्वे गाड्यांचा थांबा नियमित करा वंचित बहुजन तर्फे जनरल म्यानेजरला निवेदन सादर*

काटोल :- कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्या मुळे रेल्वेच्या सर्व गाड्या चालु करण्यात आल्या असताना दोन वर्षापासून काटोल नरखेड स्टेशनवर सुपर फास्ट गाड्या थांबवल्या जात नाही.नागपुर आमला प्यासेंजर सुद्धा बंद होती त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र आंदोलन केले होते.त्यानंतर प्यासेंजर चालु करण्यात आली त्यामुळे बऱ्याचशा लोकांना फायदा झाला आहे.
सुपर फास्ट गाड्यांना काटोल नरखेड स्थानकावर थांबा नसल्यामुळे अनेकांना फटका बसत आहे. छोटे मोठे व्यापारी M P S C. U P S C च्या परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या आजारावर उपचार घेत असलेले रुग्ण व ईतर राज्यात शासकीय सेवा देणारे कर्मचारी व कामगार यांना मोठा फटका बसत आहे.
कोरोणा च्या अगोदर जयपूर दक्षिण गोंडवाना जबलपूर छत्तीसगढ़ आग्रा दिल्ली अश्या सुपर फास्ट गाड्या थांबत होत्या त्या गाड्यांना पुन्हां काटोल नरखेड स्थानकावर थांबवाव्या यासाठी आज काटोल येथे जलालखेडा रेल्वे चौकीचे निरीक्षण करण्याकरिता रेल्वेचे जनरल म्यानेजर आले, असताना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष व न प काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात निवेदन सादर करण्यात आले.
यावेळेस.काटोल शहर अध्यक्ष डॉ सुधाकर कावळे युवक आघाडीचे तालुका महासचिव सतिश पाटील.ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव देशभ्रतार दिगांबरराव भगत प्रा विरेंद्र इंगळे गुलाबराव शेंडे रामरावजी पाटील उपस्थित होते.