*अँड.प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून साजरा*
काटोल:- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढ दिवस स्वाभिमान दिवस म्हणून काटोलात कार्यकर्त्याकडुन भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सकाळी ग्रामीण रुग्णालय काटोल येथील रुग्णांना नातेवाईकाना परिचारिका कर्मचारी डॉक्टर्स बांधवांना बिस्कीट व केळी, आंबे ,अंगुर फळ वाटप करण्यात आले.
त्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पन करून केक कापण्यात आला कार्यकर्त्यानी आंबेडकर चौकातील फुटपाथ दुकानदारांना मिठाई वाटप करत आनंद उत्साह साजरा केला. ''काटोलात अबकी बार नगर परिषदमे वंचित की सरकार'' असे नारे देत वाढदिवस मोठ्या आनंदाने वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष न प काटोल चे माजी सभापती दिगांबर डोंगरे यांच्या नेत्रुत्वात नगर परिषदेत वंचित चा झेन्डा फडकवुनच बाळा साहेबांचे हाथ बळकट करण्याचा निर्धार कार्यकर्त्यानी केला.
यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दिगांबर डोंगरे, काटोल तालुका अध्यक्ष देविदास घायवट ,शहर अध्यक्ष सुधाकर कावळे जिल्हा प्रवक्ता सुमेध गोंडाने, प्रा.विरेंद्र इंगळे महिला आघाडीच्या तालुका प्रभारी सुजाता डबरासे काटोल शहर महिला आघाडीच्याअध्यक्षा मिना पाटील. प्रभारी प्रद्न्या डोंगरे, सुरेशराव देशभ्रतार, दिगांबर भगत, रामराव पाटील, शंकरराव काळभांडे, श्रीकृष्ण ढोके, दिनेश तायडे,अशोकराव बागडे, श्रीकांत गौरखेडे, प्रफुल्ल सोमकुवर, अनिल रंगारी, मनोज देशभ्रतार, बादल वासनिक ,सुजीत, बारमासे,सिलदास वाहने ,जाकीर शहा.विद्या तागडे ,मोना गजभिये, कुसुम तायडे ,अनिता गजभिये, किरण गायकवाड ,मनिषा शेंडे,विकास दुपारे ,संयम दुपारे ,मारोती सुरजुसे, ओंकार मलवे,देवा थोटे, निकेश कोल्हे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. डवरे ,डॉ. करांडे व डॉ.शकील युवराज थोटे परिचारिका भगिनी व कर्मचारी बांधव व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.