काटोल तालुक्यात शेतक-यांची रामगढ फारमर्स प्रोड्युसर कंपनीत कोंढाळी सर्कल च्या 22 गावांमधील सातसे पन्नास शेतक-यांचा समावेश

1.

नागपुर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी सर्कल च्या २२गावांचे सातशे पन्नास शेतकर्यांना एकत्रित आणून   रामगढ फामर्स प्रोड्यूसर कंपनी  तालुक्यातील एकमेव मोठी कंपनी कोंढाळी येथे स्थापन करण्यात आली आहे.

या कंपनीने मागील एक वर्षात सर्व ७५० शेतकरी सदस्यांचे  शेअर्स सर्टिफिकेट  चे वाटप व  रामगढ फारमर्स प्रोड्यूसर कंपनी  चे संस्थापक व संचालक मंडळने केलेल्या कामाचा आढावा  व  येत्या मार्च महिन्याआधी आणखी शेयर्स एकत्रित करून कंपनी ला भावी वाटचालीची दिशा ठरविण्या साठी 17 जानेवारी दुपारी तिन वाजता येथील टेकाडे सभागृहात  नाबार्ड चे डि डी एम सचीन सोनवणे,नागेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट चे प्रमुख एच एम वि  मुर्ती, काटोल तालुकाआत्मा चे अध्यक्ष योगेश गोतमारे,रामगढ फारमर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे अध्यक्ष गेंदराज राऊत,बैंक आफ इंडिया चे कृषी विकास अधिकारी  शुभम कापसे, यांचे उपस्थितीत.

 प्रास्तविक भाषणात अध्यक्ष  गेंदराज राऊत यांनी सांगितले की शेतकर्यांनों "आत्महत्ये पेक्षा आत्म संन्मानाने जगा " याकरीता आपण स्थापन केलेल्या  कंपनी चे माध्यमातून शेतकर्याना शेती उपयोगी साहित्य, दर्जेदार बी-  बियाणे  पुरवढा व जोड व्यवसायाला  लागनारे मार्गदर्शन व सहकार्य देण्यात येईल असे सांगितले.तर नाबार्ड चे अधिकारी यांनी शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. तसेच देशाच्या विकासाचा कणा आहे. शेतकर्यांचे राहणिमान उंचावण्यासाठी केंद्र व राज्य सरकार च्या अनेक योजना आहेत. त्या योजना सर्व शेतकर्यांपर्यत पोहोचल्या पाहिजे, तसेच शेतकरी बांधवानी एकत्रित येऊन नाबार्ड चे माध्यमातून विविध सोयी सवलती च्या योजनांचा लाभ घ्यावा अशी माहिती सचीन सोनवाणे  यांनी दिली. तर भारत सरकार च्या केंद्रीय व व क्षेत्रीय योजनां अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी  नागेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट  ही शेतकरी व केंद्र सरकार चे समन्वय चे भूमिकेतून  योग्य मार्गदर्शन देण्यासाठी योगदान करते अशी माहिती ट्रस्ट चे प्रमुख  एच एम मुर्ती यांनी दिली.

 या प्रसंगी रामगढ फारमर्स प्रोड्यूसर कंपनी चे संचाकानी अनेक प्रश्न विचारले.त्यावर नाबार्ड चे वरिष्ठ अधिकार्यांनी संचालकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

या  प्रसंगी रामगढ फारमर्स प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड चे संचालक (बी पी ओ) मनिष वाघे,रणजीत काळे,संजय गोतमारे,गौरव कडू,सुजीत गोडबोले,प्रमोद धारपुरे,साधना तायवाडे,सरोज दुपारे,वर्षा सिरसाम  व नागेश्वरा चॅरिटेबल ट्रस्ट चे कार्यकर्त्यांनी  सहकार्य केले आभार संचालक प्रमोद धारपूरे यांनी मानले.