पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण
प्रतिनिधी- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळा संपन्न झाला.या लोकार्पण सोहळ्यासाठी त्यांच्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार व विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडवणीस उपस्थित होते.लोकार्पण सोहळा संपन्न झाल्यांनातर सभेचे नियोजन करण्यात आले होते या सभेत संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणत पंतप्रधानांनी सर्व वारकरी संप्रदायाचे लक्ष वेधून घेतले व पंढरपूर आषाढ वारी पालखी मार्गाच्या कामासाठी तब्बल ११ हजार कोटी रुपये खर्च करण्याची मोठी घोषणा देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी केली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम ५ टप्प्यांत आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाचे काम ३ टप्प्यात होईल, असा विश्वास पंतप्रधानांनी दिला.