* नांदेड येथे बांधकाम व्यवसाय बिल्डर ची दिवसाढवळ्या हत्या*

* नांदेड येथे बांधकाम व्यवसाय बिल्डर ची दिवसाढवळ्या हत्या*

बी पी एस राष्ट्रीय न्युज नांदेड

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी- सम्मेद तरटे

नांदेड-     नांदेड येथील बांधकाम व्यवसायिक बिल्डर संजय बिर्याणी यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. बिल्डर बियाणी हे सकाळी 11 :30 च्या आसपास दुचाकीवरुन जात असताना त्यांच्या गाडीसमोर थांबून दोघाजणांनी त्यांना जवळून गोळ्या झाडल्या आणि बिल्डर बियाणी हे जागेवरच गंभीर जखमी झाले.

तेथून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करत असताना त्यांचा मृत्यू झाला. बियाणी यांना तीन वर्षापूर्वी खंडणीची मागणी केली होती असे सांगण्यात येते. तीन महिन्यांनंतर त्यांना पोलीस प्रशासन द्वारा त्यांचे सुरक्षा हटविल्यानंतर त्यांचा अंदाज घेऊन त्यांची हत्या करण्यात आली.

माहिती मिळाल्या नुसार संजय बियाणी हे दुपारी जेवणासाठी घरी येताना गाडीतून उतरल्यानंतर घराकडे वळत असताना त्यांच्यावर दोघा जणांनी गोळ्या झाडून हत्या आली आणि तेथून हे आरोपी फरार झाले. पूर्ण नांदेड शहरात भीतीचे खळबळजनक वातावरण निर्माण झाले.