दहा रुपयाचा मावा घेऊन गेला अमरापूरचा बलभीम पठाडे ला जेलात सरकारी कार्यालयात मावा खाऊन जात आहे सावधान.

दहा रुपयाचा मावा घेऊन गेला अमरापूरचा बलभीम पठाडे ला जेलात सरकारी कार्यालयात मावा खाऊन जात आहे सावधान.

दहा रुपयांचा मावा घेऊन गेला अमरापूरचा बलभीम पठाडे ला जेलात सरकारी कार्यालयात मावा खाऊन जाताय सावधान !!!!

शेवगाव : तोंडातील गुटखा बाहेर थुंकून ये, बोलतांना अंगावर थुंकी उडत आहे, असे सांगितल्याच्या रागातून ढोरजळगाव ता. शेवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंदातील वैदयकीय अधिका-यास एकाने मारहाण केली. याप्रकरणी वैदयकीय अधिकारी सुशीलकुमार सुरेश बडे (वय-३४) यांच्या फिर्यादीवरुन बलभिम मुरलीधर पठाडे (वय-४४) राहणार अमरापूर ता. शेवगाव यांच्याविरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदयकीय अधिकारी बडे हे आज तपासणी कक्षात एका रुग्णाची तपासणी करत होतो. त्यावेळी तपासणी कक्षात गुटखा खावून पठाडे याने प्रवेश केला. त्यामुळे बोलतांना अस्पष्ट ऐकू येत असल्याने आपण त्यास तोंडातील गुटखा बाहेर थुंकून ये, बोलतांना अंगावर थुंकी उडत आहे. असे त्यास म्हणालो असता त्याचा येवून त्याने तोंडावर मारहाण करत शिवीगाळ केली. पाठीत, पोटात व कपाळावर मारहाण करत जिवेमारण्याची थमकी दिली. कार्यालयातील खुर्च्या फेकून टेबलावरील कागदपत्रे अस्ताव्यस्त केली. यावेळी अरडाओरड झाल्याने तेथे मिटींगसाठी आलेल्या व आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांनी सोडवासोडवी केली. यानंतर सर्व कर्मचा-यांनी तेथील कामकाज बंद करुन पठाडे यास पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. याबाबत बडे यांच्या फिर्यादीवरुन पठाडे यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागूल हे करीत आहेत.

    दरम्यान पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील परीचारीका व कर्मचा-यांनी पोलीस ठाण्यात येवून या घटनेचा निषेध करत  संबंधीतावर कडक स्वरुपात कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, दहिगांवनेचे वैदयकीय अधिकारी कैलास कानडे, अक्षय बांगर, संभाजी आव्हाड, विजय लांडे, परेश्वर गलांडे, शिशीर शिरसाठ, कल्याण मुटकुळे, श्रीराम चव्हाण, राणी शिरसाठ, ललिता कासोळे, सिमा मडके, मंदाकिनी घोरपडे आदींसह भाजपचे गणेश कराड   उपस्थित होते. 

ताजा कलम

शेवगांव चा मावा जिल्हाभरात प्रसिद्ध आहे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 500 रुपये दंड हा जुना चं कायदा आहे पण शेवगांव शहरातील बहुतेक सर्वच सरकारी कार्यालयांच्या भिंती आणि कोपरे माव्याच्या पिचकारीने लाल झालेले दिसतील ते अन्न भेसळ चे कार्यालय आणि पोलीस कुठं असतात ओ ?