स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई संगमनेर व राहुरी परिसरातून पिकप व भंगार चोरी करणारे सराईत आरोपी मुद्देमालासह जेरबंद.
संगमनेर व राहुरी परिसरातुन पिकअप व भंगार चोरी करणारे 5 आरोपी 7,90,000/- रुपये किंमती मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.
याबाबतचा सविस्तर वृत्तांत असा आहे की जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना अहमदनगर जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेवुन, मिळुन आल्यास कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक रविंद्र कर्डीले, फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब गुंजाळ, चालक हेड कॉन्स्टेबल अर्जुन बडे व अरुण मोरे अशा पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.
पथक दिनांक 30/09/2023 रोजी नगर मनमाड रोडने श्रीरामपूरकडे जात असताना राहुरी फॅक्ट्ररी येथुन एक पिकअप वाहन भरधाव वेगाने राहुरीच्या दिशेने जाताना दिसली . पथकास सदर पिकअपचा संशय आल्याने त्यांनी पोलीस निरीक्षक. दिनेश आहेर यांना संशयीत वाहना बाबत कळविले. पोलीस निरीक्षक आहेर यांनी तात्काळ पिकअपचा पाठलाग करुन संशयीतांकडे चौकशी करण्या बाबत सुचना दिल्या . त्याप्रमाणे पथकाने संशयीत वाहनाचा पाठलाग करुन थांबविले असता केबिनमध्ये तीन व पाठीमागील ट्रॉलीचे हौदात दोन इसम बसलेले दिसले.
त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) जैद मुश्ताक सय्यद वय 19, 2) उमर बशीर शेख वय 21, दोन्ही रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी, 3) मुजम्मिल मन्सुर शेख वय 22, रा. बेलापुर, ता. श्रीरामपूर, 4) नजीर रज्जाक सय्यद वय 24, रा. तनपुरेवाडी, ता. राहुरी व 5) सोहेल इब्राहिम पठाण वय 19, रा. नांदुर रोड, ता. राहुरी असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे नमुद पिकअप वाहनाचे कागदपत्र व त्यामधील भंगार सामान याबाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना विश्वासात घेवुन अधिक सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी सदर पिकअप संगमनेर येथुन चोरुन आणला असुन, वाहनातील भंगार सामान हे युनूस स्क्रॅप सेंटर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी येथुन चोरी केल्याची कबुली दिली.
पथकाने आरोपींनी दिलेल्या कबुलीचे अनुषंगाने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे 2 गुन्हे उघडकिस आले आहेत.
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर तालुका 636/23 भादविक 379
2. राहुरी 1119/23 भादविक 379
आरोपीचे कब्जातुन राहुरी येथुन चोरी केलेले 6,40,000/- रुपये किंमतीचे 1,600 किलो वजनाचे पिवळे धातुचे भंगार सामान व संगमनेर येथुन चोरी केलेली 1,50,000/- रुपये किंमतीची पिकअप असा एकुण 7,90,000/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी जैद मुस्ताक सय्यद हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व संभाजीनगर जिल्ह्यात चोरीचे एकुण -02 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. गंगापुर जिल्हा संभाजीनगर 190/23 भादविक 379, 34
2. नेवासा, जिल्हा अहमदनगर 1178/22 भादविक 379 (फरार)
सदर कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर , अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. डॉ. बसवराज शिवपुजे , उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.