कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 57 गोवंशीय जनावरांची सुटका ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी करवाई

कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या 57 गोवंशीय जनावरांची सुटका ; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी करवाई

 *संगमनेर मध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवलेल्या 57 गोवंशीय जनावरांची सुटका*

 *स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई*

पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने संतोष मुटकुळे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी पोउपनि/विकास जाधव व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, राहुल द्वारके, विजय पवार, राहुल डोके, सतीष भवर, अमृत आढाव, योगेश कर्डीले, रिचर्ड गायकवाड, भगवान थोरात, सुनिल मालणकर, बाळासाहेब गुंजाळ व जालींदर साखरे अशांचे पथके तयार करून अवैध धंदयाची माहिती काढुन, कारवाई करणेबाबत सुचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले. 

 

 दिनांक 02/11/2026 रोजी पथकाने संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत गोवंशीय जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबुन ठेवलेल्या इसमाची माहिती काढुन 02 ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. पथकाने केलेल्या कारवाईमध्ये खालीलप्रमाणे 02 गुन्हे दाखल करून एकुण 19,60,000/- रूपये किंमत त्यात 57 गोवंशीय लहान मोठे जिवंत जनावरे जप्त केली.

 

अ.क्र. पोलीस गुरनं व कलम जप्त मुद्देमाल मुद्देमालाचे वर्णन आरोपीचे नाव

1 संगमनेर शहर 1037/2026 म.पशुसंरक्षण कायदा 5 (अ), 5(ब), 9 इत्यादि जप्त मुद्देमाल 16,00,000/- मुद्देमालाचे वर्णन 48 गोवंशीय जनावरे 1) सोहेल समीर शेख, वय 27, रा.कुरण, ता.संगमनेर 

2 संगमनेर शहर 1038/2026 म.पशुसंरक्षण कायदा 5 (अ), 5(ब), 9 इत्यादि जप्त मुद्देमाल 3,60,000/- मुद्देमालाचे वर्णन 9 गोवंशीय जनावरे 1) वसीम शेख पुर्ण नाव माहित नाही (फरार)

2) सद्दाम कुरेशी पुर्ण नाव माहित नाही (फरार) दोन्ही रा.कुरण, संगमनेर

 वरील कारवाई मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.