दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या इसमांवर पोलिसांची कारवाई, गोटुंबे आखाडा येथून दोन इसम मुद्देमालासहित ताब्यात .
*अवैध दारू वाहतूक करणाऱ्या इसमावर पोलिसांची कारवाई*
प्रस्तुत घटना अशी की दिनांक 10/07/2024 रोजी सकाळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना गुप्त बातमी दारामार्फत बातमी मिळाली की, राहुरी शहरातुन अवैधरित्या वाहनावरून दारूची चोरटी वाहतूक होत आहे अशी बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी तात्काळ पथक तयार करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पाठवून वाहनांमध्ये अवैधरित्या दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्याने पथकाने बातमीच्या ठिकाणी सापळा लावून गोटूंबे आखाडा येथे मोटर सायकल (होंडा कंपनीची शाईन गाडी ) क्रमांक MH17CC. 7566 या वाहनावर इसम नामे 1) आकाश भाऊसाहेब लेकुळे वय 25 राहणार शनी चौक राहुरी ता.राहुरी जिल्हा अहमदनगर 2) सुनील विठ्ठल जगधने राहणार देशवंडी तालुका राहुरी दारूची चोरटी वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांच्याकडून एकूण 7680 ₹ . किंमतीची देशी दारू व 80,000/- ₹ किंमतीची हिरो होंडा कंपनीची शाईन गाडी एकूण मुद्देमाल 87680 /- रु मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर जि . अहिल्यानगर,डॉ.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे यांचे नेतृत्वाखाली , पोलीस हेड कॉन्स्टेबल अर्जुन दारकुंडे . पोलीस हेडकॉन्स्टेबल सतीश आवारे पोलीस नाईक गणेश सानप पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिरसाट. पोलीस हवालदार शकूर सय्यद नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर यांनी केलेली आहे.








