महात्मा फुले भवनाचे मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण
काटोल/ दि. ३ फेब्रुवारी रोज गुरुवारला 'महात्मा फुले भवन' संचेती ले आऊट नागपूर रोड, बसस्टॉप जवळ, काटोल ता . काटोल जि . नागपूर या सर्व शाखीय माळी समाज भवनाचे उद्घाटनाचा कार्यक्रम दुपारी ४ - ०० वा पार पडला . कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्ता पक्ष गटनेते चरणसिंग ठाकूर यांचे प्रतिपादन,महात्मा फुले भवनातून महात्मा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजापर्यंत पोहचेल व येनारी नविन पीडीचे भविष्य उज्वल होईल असे ते म्हणाले. तर उद्घाटक दिनेशजी ठाकरे अध्यक्ष कृषी प्रतिष्ठान काटोल हे होते . प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक देविदासजी कठाणे , किशोरजी गाढवे, नगरसेवक तानाजीभाऊ धोटे,काळे सर उपस्थित होते.तसेच संत सावता माळी संस्था काटोल चे अध्यक्ष पंजाबराव दंढारे, उपाध्यक्ष हितेंद्रजी गोमासे ,कार्याध्यक्ष रामरावजी भेलकर, सचिव रमेशराव तिजारे, संघटक पंचायत समिती सदस्य संजय डांगोरे, श्री.ज्ञानेंद्रजी खेरडे महाराज प्रामुख्याने उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयराव महाजन सर संचालक यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक तुलसीदास फुटाणे, अशोकराव डांगोरे, प्रभाकरराव देवते, विश्वंभर अकर्ते, सुनिल चोरकर, पुरुषोत्तमजी कुबडे, अरविंदजी तरार, प्रकाशराव श्रीखंडे, हेमंतजी घोरसे, प्रकाशराव मानेकर, ज्ञानेश्वरराव बोढाळे, शेषरावजी वरोकर, विद्यानंद वरोकर, पुरुशोत्तमजी चरपे , नरेंद्रजी बोढाळे, प्रशांतजी पवार, ताराचंद्र कांडलकर यांनी सहकार्य केले . कार्यक्रमाला बहुसंखेने समाज बंधू भगिनी उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ,किरण डांगोरे संचालक आणि आभार ,रमेशराव कांबळे सहसचिव यांनी मानले .
शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली .