दिवंगत संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. ---- लोकनेता ना रामदास आठवले

दिवंगत संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. ---- लोकनेता ना रामदास आठवले
दिवंगत संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. ---- लोकनेता ना रामदास आठवले

 मुंबई ( प्रतिनिधी ) :- भिवंडीतील दलित युवक संकेत भोसले यांची किरकोळ कारणावरून अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली.या हत्या प्रकरणाचा  रिपब्लिकन पक्षातर्फे आम्ही तीव्र निषेध करतो. यातील आरोपींनी मानवतेला  काळिमा फासला आहे.भिवंडीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात या दलित युवक हत्येमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दलित युवक संकेत भोसले हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा करावी अशी मागणी आज रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली. 

भिवंडीतील खून झालेल्या दलीत युवक संकेत भोसले यांच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज भिवंडीत सांत्वनपर भेट घेतली.यावेळी राज्यशासनातर्फे दिवंगत संकेत भोसले कुटुंबियांना सव्वा आठ लाख  रुपये सांत्वनपर निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 10 लाख रुपये सांत्वनपर निधी मिळवून देणार असल्याचे आश्वासन देऊन रिपब्लिकन पक्षातर्फे 2 लाख रुपयांचा सांत्वनपर निधी देत असल्याचे ना.रामदास आठवले यांनी जाहीर केले. त्यापैकी आज 50 हजार रुपयांची सांत्वनपर मदत ना.रामदास आठवले यांच्या हस्ते दिवंगत संकेत भोसले यांच्या कुटुंबाला देण्यात आली.  यावेळी एसीपी सांगळे;रिपाइं चे भिवंडी जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड; रिपाइं राष्ट्रीय सचिव सुरेश बारशिंग; ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संजय गायकवाड; सुमित वजाळे; चंद्रशेखर कांबळे; संगीता गायकवाड आदी अनेक रिपाइं चे पदाधिकारी उपस्थित होते.