नगर जल्लोष परिवाराच्या वतीने जितेंद्र तोरणे ‘बिझीनेस आयकॉन’ पुरस्काराने सन्मानित
श्रीरामपूर (प्रतिनिधी) ः नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्या वतीने आयोजित कार्यक्रमात तालुक्यातील पढेगाव येथील उडाण फाऊंडेशनचे अध्यक्ष जितेंद्र तोरणे यांना अहमदनगर शहराच्या ५३२ व्या स्थापना दिनानिमित्त बिझिनेस आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच दोन राष्ट्रपतीपदक विजेते व ५५ वेळा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अमोल बागुल यांना एज्युकेशन आयकॉन, माऊली सेवा प्रतिष्ठाणचे संचालक डॉ.राजेंद्र व सुचेता धामणे यांना नगरभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शनिवार, दि.२८ मे २०२२ रोजी सायं. ६ वा. सावेडी येथील जॉगिंग पार्क मैदानावर नगर जल्लोष-२०२२ चे आयोजन करण्यात आले होते. सिने अभिनेत्री मानसी नाईक, मुक्ता बर्वे, अभिनेते संदिप पाठक, नंदू माधव, ओंकार गोवर्धन, गायिका सन्मिता शिंदे, इंडिय आयडॉल फेम कैवल्य केजकर, महाराष्ट्राच्या हास्यजत्रा फेम गौरव मोरे, वनिता खरता आदींची प्रमुख उपस्थिती होते.
जितेंद्र तोरणे हे उद्योग व्यवसाय सांभाळून उडान फाऊंडेशनच्या वतीने विविध समाजिक उपक्रम राबवित असतात. त्यांनी इलेक्ट्रिकल क्षेत्रातध्ये अल्पावधीत नावलौकिक मिळविला आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन नगर जल्लोष ट्रस्ट परिवाराच्या वतीने त्यांचा बिझीनेस आयकॉन पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष सागर बोगा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, नेताजी सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष रणजित बनकर, ऍड.प्रविण लिफ्टे, कारखान्याचे संचालक यशवंतराव बनकर, रामभाऊ लिफ्टे आदी उपस्थित होते. BPS live news रिपोर्टर दिपक कदम श्रीरामपूर