कृषी विभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृषी पर्यवेक्षक श्री बाळासाहेब लांबे यांचा सन्मान .
कृषी विभागातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन २०२१ - २२ या वर्षामध्ये कृषी पर्यवेक्षक श्री बाळासाहेब लांबे यांचा उत्कृष्ट कृषी पर्यवेक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे . त्याचबरोबर मानपत्र , पुष्पगुच्छ देऊन त्यांना कृषी विभागामार्फत सन्मानित करण्यात आले आहे .
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव -२ येथे कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री बाळासाहेब लांबे यांनी महाडीबीटी अंतर्गत सिंचन साधने ठिबक व स्प्रिंकलर संच तपासणी तसेच कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत ट्रॅक्टर अवजारे यंत्र व अवजार बँक यांची तब्बल ६३७ शेतकऱ्यांचे मोका तपासणी करत रुपये १.००कोटी पेक्षा जास्तीचे अनुदान शेतकऱ्यांना कमीत कमी वेळेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर केले आहे .शेतकऱ्यांना कमी वेळेत कृषी विभागामार्फत राबविण्यातयेणाऱ्या योजनांचा लाभ मिळवू न देण्याचे काम श्री बाळासाहेब लांबे यांनी केले आहे . कृषी विभागांमध्ये आपल्या कामाची वेगळी छाप निर्माण करून कृषी विभागाची मान उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे .
आत्मा अंतर्गत स्मार्ट योजनेत तसेच पणन मंडळाच्या मॅग्नेट प्रकल्पांतर्गतही उल्लेखनीय काम केले आहे .कृषी विस्तार कार्यात शेतीशाळा पिक विमा प्रकल्प राबवणे तसेच नरेगा अंतर्गतची विशेष कामे केली आहे .या अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरीबद्दल श्री बाळासाहेब लांबे यांचा तालुका कृषी अधिकारी कार्यालय संगमनेर येथे उपविभागीय कृषी अधिकारी श्री सुधाकर बोराळे,तालुका कृषी अधिकारी श्री प्रवीण गोसावी यांच्या हस्ते मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच कृषी विभागाच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत .त्यांना मिळालेल्या या सन्मानाचे कृषी विभागातून तसेच शेतकरी मित्रांमध्ये कौतुक होत आहे .