मराठा साम्राज्याचे अपराजीत योद्धे श्रीमंत बाजीराव यांची आज पुण्यतिथी.

मराठा साम्राज्याचे अपराजीत योद्धे श्रीमंत बाजीराव यांची आज पुण्यतिथी.

२८ एप्रिल १७४० श्रीमंत बाजीराव साहेब पुण्यतिथी (समाधी, रावळखेडी-मध्यप्रदेश)...

छत्रपती शाहू महाराजांनी १७२० साली पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या १९ वर्षाच्या ज्येष्ठ पुत्रास म्हणजेच बाजीराव बल्लाळ यांस पेशवे पदावर नियुक्त केले पेशवे पदाची सुत्रे स्विकारल्या नंतर पुढील वीस वर्षे बाजीराव साहेबांनी मराठा साम्राज्याचा विस्तार सबंध हिंदुस्तानभर वाढवला अत्यंत प्रभावशाली व्यक्तित्व, जन्मजात नेतृत्वशक्ती, अद्भुत रणकाैशल्य, अदम्य साहसी वृत्ती इ सर्व अंगीभूत गुणांमुळे बाजीराव साहेबांनी अत्यंत कमी कालावधी मध्ये भारतातील सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून मराठा साम्राज्याची ओळख निर्माण केली दरारा निर्माण केला आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीमध्ये एक हि युद्धं न हारलेला एकमेव अपराजित योद्धा सेनानी अशीच त्यांची ओळख होती आणि ती आज हि कायम आहे...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नाचे हिंदवी साम्राज्यात रुपांतर करणारा हा मराठा साम्राज्याचा महान पराक्रमी पेशवा २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदाकाठी रावळखेडी येथे परलोकीच्या प्रवासाला कायमचा निघून गेला...

आम्ही तो थोरल्या आबासाहेबांचे पाईक” असं श्रीमंत बाजीराव साहेब म्हणत असत अन तसंच ते जगले..

हिंदुस्तानच्या या महान सुपुत्रास व मराठा साम्राज्याच्या या एकमेवा द्वितीय अपराजित महापराक्रमी प्रधानपंतास विनम्र अभिवादन..