खेडले परमानंद येथील विहिरीवरील इलेक्ट्रिक स्टार्टर चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या रडारवर.

खेडले परमानंद येथील विहिरीवरील इलेक्ट्रिक स्टार्टर चोरी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या रडारवर.

प्रतिनिधी नगर //

       

खेडले परमानंद येथील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारीच्या स्टार्टर चोरीच्या घटनेत वाढ. आरोपी पोलिसांच्या  रडारखर.                                                                 नेवासा     तालुक्यातील मुळाथंडीच्या गावातील विहिरीवरील इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्समधील स्टार्टर चोरीच्या घटनेत वाढ झाली असून त्यामुळे मुळाथडीच्या खेडले परमानंद, शिरेगाव, पानेगाव, निंभारी आदी गावामधून बरेचसे स्टार्टर चोरीला गेले चोरांनी आपला मोर्चा स्टार्टर चोरीकडे वळविला असल्याने   त्यामुळे या भागातील शेतकरी  त्रस्त झाला आहे आज बाजारामध्ये नवीन स्टार्टर घ्यायचे झाल्यास दोन ते अडीच हजार रुपये लागतात नेमके हे चोर स्टार्टरवर डल्ला मारत असल्याने बळीराजाला दुसऱ्या दिवशी स्टार्टर विकत घेऊन पंप चालू करावा लागतो त्यामुळे या स्टार्टर चोरांचा पोलिसांनी शोध लावावा अशी मागणी या गावातील शेतकऱ्यांनी केली आहे दिवसेंदिवस या घटनेमध्ये वाढ होत आहे खेडले परमानंद येथील बऱ्याचशा इलेक्ट्रिक मोटारीच्या पॅनल बॉक्स मधून स्टार्टर चोरी गेली असल्याने पॅनल बॉक्समध्ये फक्त कट आउट फक्त शिल्लक राहतात एक तर पाण्याचा दुष्काळ त्यात अशा  चोरीच्या घटना घडत आहेत सातत्याने स्टार्टर चोरीच्या घटना घडत असल्याने रात्र जागून काढण्याची वेळ या भागातील शेतकऱ्यावर आली आहे हे भुरटे चोर स्थानिकच असल्याची शंका शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे याप्रकरणी पोलिसांनी बारीक तपास करून या स्टार्टर चोरांना आळा घालण्याची मागणी होत आहे