चर्मकार समाज हा अतिशय नम्रतेचा व सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज .- सूनिताताई गडाख

चर्मकार समाज हा अतिशय नम्रतेचा  व सर्वांना सोबत घेऊन चालणारा समाज .- सूनिताताई गडाख

आज नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संत रोहिदास जयंती व रोहिदास महाराज मंदिर च्या कठाडे चे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य अनिल राव अडसुरे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.सभापती सुनीता ताई शंकरराव गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

             या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चर्मकार विकास संघाचे नेवासा तालुका उपाध्यक्ष गणेश बहिरणाथ एडके सर यांनी केले. प्रास्ताविकात संत रोहिदास महाराज जीवन चरित्र बद्दल अनमोल मार्गदर्शन केले .

        यानंतर देडगाव चे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी आपल्या मनोगतातून माननीय नामदार शंकरराव गडाख साहेब यांच्या प्रयत्नाने देडगावातील जमीनीवरील पोट खराबा याचा मोठा प्रश्न मार्गी लावला. व गावात वेगवेगळ्या स्वरूपात निधी दिला त्याबद्दल देडगाव ग्रामस्थांच्यावतीने त्यांचं अभिनंदन व स्वागत करण्यात आले. यानंतर शिवसेनेचे तालुका प्रमुख मच्छिंद्र म्हस्के पाटील , सुखदेव महाराज मुंगसे ,चंद्रभान कदम,पोस्ट मास्तर तांबे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

     यावेळी नेवासा तालुक्याच्या माजी सभापती माननीय सुनीताताई शंकराव गडाख यांनी प्रथम संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करुन, आपल्या मार्गदर्शनातून हा समाज अतिशय शांत संयमी व जमिनीवर पाय ठेवून चालणारा समाज आहे अशा मार्मिक शब्दांमध्ये या समाजाचे कौतुक केले .व नामदार शंकरराव गडाख साहेब यांच्या प्रयत्नांनी नेवासा तालुक्यातील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा गडाख कुटुंबीयांचा माणस आहे. व तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या.या शब्दात ताईंनी देडगावकरांचे मने जिंकली.

      यावेळी कार्यक्रमास ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक बाजीराव पाटील मुंगसे ,मा. उप सभापती कारभारी पाटील चेडे, पंचायत समिती सदस्य वैशाली ताई एडके, विद्यमान उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर, नेवासा तालुका शिवसेनेचे तालुका उपप्रमुख रामानंद मुंगसे पाटील, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे अभिजीत ससाने ,माजी चेअरमन कडूभाऊ तांबे, मा.चेअरमन बाबासाहेब पाटील मुंगसे, मा. लक्ष्मणराव बनसोडे , जनशक्ती न्यूज चॅनलचे प्रल्हाद एडके,सुभाष मुंगसे, बन्सी मुंगसे, युवा नेते श्रीकांत हिवाळे, माजी चेअरमन योसेफ हिवाळे , शरद हिवाळे,अशोक मुंगसे ,मधुकर शिरसागर, महादेव मुंगसे ,युवा नेते आकाश चेडे,व्यवसायिक संघटनेचे अध्यक्ष किशोर मुंगसे ,ग्रामपंचायत सदस्य भारत कोकरे, अकबरभाई पठाण, भैया पठाण, दिलदार सय्यद, उद्धव मुंगसे, दादासाहेब एडके ,कडूभाऊ दळवी, शेळके बहिरनाथ एडके, राजू एडके बाळासाहेब बताडे,हरिभाऊ एडके ,ग्राम विकास अधिकारी ऊलारे भाऊसाहेब ,किरण काळे, मांदुळे ,साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक युनूस पठाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार देवस्थान चे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार बन्सी भाऊ एडके यांनी मा

नले.