प्रशांत भाऊ गडाख यांच्या वाढ दिवसा निमित्त देडगावात वृक्षारोपण.
*प्रशांत भाऊ गडाख यांच्या वाढदिवसानिमित्ताने देडगावात वृक्षारोपण.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण ) :- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे मुळा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊ गडाख यांच्या वाढदिवसानिमित्ताने शिक्षण भूषण ज्येष्ठ नागरिक बाजीराव पाटील मुंगसे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड सर बोलताना म्हणाले की ,प्रशांत भाऊ गडाख हे निसर्गप्रेमी आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण व अनेक उपक्रम आयोजित करण्यात येतात. व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर वर्षभर चालत असतात. म्हणून अनावश्यक खर्चाला फाटा देत प्रत्येकाने वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करावा .वाढदिवस निमित्त एक तरी झाड लावा असा संकल्प या वाढदिवसानिमित्ताने करावा. प्रत्येकाने समाजापुढे आदर्श ठेवावा. झाड लावणे सोपे असते परंतु संवर्धन अवघड असते म्हणून प्रत्येकाने झाडाचे संवर्धन करा व निसर्गाचा समतोल ठेवावा. अशा विविध बाबी सांगत प्रशांत भाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रगतशील शेतकरी बन्सी पाटील मुंगसे,मा. सरपंच दत्ता पाटील मुंगसे, पत्रकार युनूस पठाण, शिवनेरी युवा ग्रुपचे अध्यक्ष हिरामण फुलारी, अमोल मुंगसे, सचिन पवार, सोमनाथ फुलारी मामा ,नवले मामा आदी मान्यवर उपस्थित होते.
आलेल्या मान्यवरांचे स्वागत व आभार वाघस्कर सर यांनी मानले.