वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारीत श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेटची दिनदर्शिका घराघरात.

*वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कारीत श्री. संत नागेबाबा मल्टीस्टेटची दिनदर्शिका घराघरात.*
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण) :- संपूर्ण महाराष्ट्रभर असणाऱ्या श्री .संत नागेबाबा मल्टीस्टेट च्या शाखा ३६५ दिवस अविरत चालणाऱ्या एकमेव शाखा आहेत. संस्थेचे चेअरमन कडूभाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार स्वच्छ व पारदर्शक चालतो .अनेक धार्मिक सामाजिक शैक्षणिक व विविध क्षेत्रांमध्ये नेहमी अग्रेसर असणारी ही संस्था आहे. व विविध पुरस्काराने सन्मानित झालेली ही शाखा आहे. भेंडा येथे प्रमुख शाखा असून संपूर्ण महाराष्ट्रभर या शाखेचे जाळे पसरले आहे .गुंतवणूकदारांसाठी विश्वसनीय शाखा म्हणून महाराष्ट्रभर ख्याती आहे.
नवीन वर्ष 2025 साठी या शाखेने खातेदार सह विविध शाखांना ,संस्थांना व ग्रामस्थांना दिनदर्शिका वाटप करत आहे.
असाच एक आदर्श उपक्रम बालाजी देडगाव येथे शाखेचे शाखा अधिकारी पांडुरंग एडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघर कॅलेंडर हा उपक्रम राबवला आहे. गावात कॅलेंडर देताना शाखेचे कर्मचारी राहुल मुंगसे व योगेश भारती तसेच खातेदार बालाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक योगेश चेडे, चांगदेव टकले, बळीराज्य संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र मुंगसे ,महेश चेडे , किशोर रणदिवे, सचिन गोयकर, पाटीलबा कदम, शिवाजी तांबे , पत्रकार युनूस पठाण आदी मान्यवरांना कॅलेंडर देण्यात आले.
या उपक्रमाबद्दल परिसरातून शाखेचे अभिनंदन होत आहे.