डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये गणित विज्ञान चित्रकला व टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन

डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये गणित विज्ञान चित्रकला व टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात नजीक असणाऱ्या डि पॉल इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे गणित ,विज्ञान, चित्रकला व विशेष म्हणजे टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनास अनेक शाळा व विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.प्रदर्शनाचे उद्घाटन हे रेव्ह.फादर थॉमसन, रेव्ह फादर पुदवा, रेव्ह.फादर थॅरेगन, रेव्ह.  फादर हेबिक, रेव्ह.सिस्टर सेलिन व रवींद्र लोंढे सर यांच्या हस्ते करण्यात आले.
    सर्वात प्रथम कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुराधा कपिले मॅडम यांनी केले. तसेच सूत्रसंचालन सोनाली झांजरी मॅडम यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे आभार एलिझाबेथ मॅडम यांनी मानले. या प्रदर्शनासाठी परीक्षक म्हणून अनिल चोभे सर, तपासे मॅडम, कल्पना सोनवणे मॅडम , जयश्री ब्राह्मणे मॅडम ,कृपाली खांडेसर मॅडम , सिस्टर रेनू, विजया पाटील मॅडम , रेवती सोनार मॅडम यांचे सहकार्य लाभले.
 आलेल्या पाहुण्यांनी सर्व प्रदर्शनातील वस्तूंचे काळजीपूर्वक निरीक्षण केले. सहभागी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रात्यक्षिका विषयी माहिती विचारली असता विद्यार्थ्यांनी त्याविषयी अचूक माहिती दिली. तसेच पालकांनी व आजूबाजूच्या परिसरातील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी या प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद दिला. प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी स्नेहलता मॅडम, सौ.स्वाती घोरपडे मॅडम , गणेश सर, विद्या लोखंडे मॅडम , मालन मोहन, नीता वराळे मॅडम , विकास वाघमारे, अनुराधा गुंजाळ मॅडम , वैशाली कदम मॅडम , सुनिता सोनवणे मॅडम ,बिना कदम मॅडम , वैशाली निंबाळकर मॅडम ,मॉली कुथुर, संदीप सर सुनील बोरगे यांनी परिश्रम घेतले.