सामाजिक संस्था "डेज" च्या वतीने अहमदनगर मधील ख्रिस्ती समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

सामाजिक संस्था "डेज" च्या वतीने अहमदनगर मधील ख्रिस्ती समाजातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अहमदनगर ::--
     अहमदनगर शहरांमध्ये "डेज" या सामाजिक संस्थेने गेल्या मागील दहा ते बारा वर्षांमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले असून कोरोना काळातही "डेज" या सामाजिक संस्थेने अनेक सामाजिक कार्य करून समाजाला आधार देण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे व "डेज" ही संस्था करत आहे .अहमदनगर शहरांमध्ये ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे ख्रिश्चन समाजाची या शहरांत सामाजिक क्षेत्रात ,शैक्षणिक क्षेत्रात, तसेच वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्याप्ती वाढलेली असून हा समाज सामाजिक क्षेत्रात पुढे असून शैक्षणिक क्षेत्रात देखील नावाजलेला आहे.
     बुधवार दिनांक 26/6/2022 रोजी  क्लेरा ब्रुस हायस्कूलमध्ये अहमदनगर मधील ख्रिस्ती समाजातील गुणवंत दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार "डेज" या संस्थे मार्फत करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष रेव्हरेंड डॉ. डी.जी.भांबळ तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ.उज्वला सचिन औताडे पोर्टपोलीको ऑफिसर युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी ,ऑस्ट्रेलिया यांनी भूषविले  
     कार्यक्रमाची सुरुवात रेव्ह.डॉ. डी.जी.भांबळ यांनी प्रार्थनेने तर रेव्ह.सनी मिसाळ यांनी आपल्या प्रभूच्या संदेशाने केली. "डेज" या संस्थेचे अध्यक्ष असणारे सत्यशील जयचंद्र शिंदे यांनी "डेज" या संस्थेने शहरांमध्ये आत्तापर्यंत कोणते - कोणते सामाजिक व वैद्यकीय उपक्रम राबवले आहे याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे दिली. रेव्ह.डॉ.डी.जी.भांबळ यांच्यावतीने बारावीचा तर प्रमुख पाहुणे असणाऱ्या उज्वला सचिन औताडे यांच्यावतीने दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. रेव्ह.डॉ.डि.जी.भांबळ यांनी अध्यक्षीय भाषणातून आपण समाजाचे एक घटक आहोत व समाजाचे आपण ऋणी  राहून आयुष्यामध्ये समाजा विषयी आदरभाव ठेवून समाजाच्या सर्व कार्यात सहभाग घेऊन आपल्या या पुढील भावी आयुष्यासाठी  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे असणार्‍या सौ.उज्वला औताडे यांनी देखील विद्यार्थ्यांना लाख-मोलाचा संदेश दिला व त्यांच्या पुढील भावी आयुष्य करीता हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल थोरात यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता स्तुरिज धिवर,स्वरूपकुमार शिंदे,शिरीष लाड,रंजीत देठे संदेश गुजराथी,सतीश घोडके अरुण बनकर,सुनीत ढगे ,रॉकी त्रिभुवन यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे को-ऑडीनेटर हे राजेश सूर्यवंशी होते. तर कार्यक्रमाकरिता आलेले सर्व प्रमुख पाहुणे व उपस्थित असणारे विद्यार्थी व पालक तसेच इतर पाहुण्यांचे आभार शिरीष लाड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता प्रभूच्या शेवटच्या प्रार्थनेने झाली तसेच आलेल्या सर्व पाहुण्यांसाठी उत्तम भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती