सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच, संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपने हत्या केल्याचे समोर आले होते, त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली होती, त्यानंतर सदरील प्रकरणातील आरोपी हे मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय असल्याचे जगजाहीर झाले होते, त्यामुळेच मंत्री मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची मागणी होत होती.
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन देखील छेडण्यात आले होते, परंतु मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास टाळाटाळ केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपुख्यमंत्री अजित पवार यांना देखील मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता, त्यांनी देखील मुंडे दोषी आढळल्यास कारवाई होईल असे सांगितले होते.
सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्घृणपणे हत्या करण्यात आली, त्या घटनेचे फोटो व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडिया वर व्हायरल झाले होते, त्या फोटोंमध्ये आरोपीं हे_संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारहाण करत होते, तसेच त्यांच्या चेहऱ्यावर लघवी केल्याचे देखील फोटोमध्ये दिसत होते, ते फोटो बघून प्रत्यकाला रडू आल्याशिवाय राहणार नाही, इतके भयंकर कृत्य ह्या प्रकरणातील सर्व आरोपींनी केले आहे.
या सर्व मुद्यांवर सरकार अडचणीत येण्याची शक्यता दिसत असल्याने, देवगिरी बंगल्यावर" मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपुख्यमंत्री अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची महत्वाची बैठक झाली त्या बैठकीत मुख्यमंत्री फडवणीस यांनी मंत्री मुंडे यांना जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्याचे ठणकावून सागितले होते, त्यामुळेच मंत्री मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.