तांभेरे येथील निळा झेंडा प्रकरणी राहुरी पोलिसांची चौकशी करण्याचे जिल्हा पोलिस प्रमुखांनी दिले आदेश ...
राहुरी तालुक्यातील तांभेरे येथे निळा झेंडा लावले प्रकरणी गावातील काही लोकांनी विरोध करून गावातील मागासवर्गीय समाजावर बहिष्कार टाकला हा बहिष्कारा सारखा गंभिर गुन्हा दडपून टाकुन गावातील मागासवर्गीय आंबेडकरी समाजातील लोकांवर एफ आय आर दाखल नसताना न्यायालयाची दिशाभूल करून दोन वेळेस पोलिस रिमांड घेऊन मागासवर्गीय समाजातील लोकांना बेकायदेशीर डांबून ठेवले होते.
याबाबत रिपब्लिकन सेनेचे जिल्हाप्रमुख राजुभाऊ आढाव यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी व दोशी पोलिसांवर कारवाई व्हावी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री. पोलिसमहासंचालक.पोलिसमहानिरिक्षक. व नगर जिल्ह्याचे पोलिसअधिक्षक यांचेकडे लेखी तक्रार देवून यापूर्वी पुराव्यासह पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणातील सत्य बाजु पत्रकारांसमोर उघड केली.
याची दखल घेऊन पोलिसअधिक्षक मनोज पाटिल साहेब यांनी मा. उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके भाग श्रीरामपूर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमनुक करून सदर प्रकरणाचा तपास श्री मिटके यांचेकडे सोपावला होता.
परंतू श्री राजु आढाव यांनी पोलिस अधिकक्षक अहमदनगर यांचेकडे तक्रार करून श्री संदीप मिटके यांच्या तांभेरे प्रकरण चौकशी अधिकारी नेमणूकीवर लेखी तक्रारीद्वारे हरकत घेऊन व पोलिस अधिक्षकांची समक्ष भेट घेऊन सदरील प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे देण्यात यावा अशी विनंती केली राजु आढाव यांची लेखी तक्रार व विनंती ग्राह्य धरून पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांचेकडून सदर घटणेचा तपास काढून घेऊन अप्पर पोलिसअधिक्षक श्रीमती स्वाती भोर श्रीरामपूर भाग श्रीरामपूर यांचेकडे सोपवण्यात आला सदर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत अशी माहिती राजुभाऊ आढाव यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.