सोनई पोलिसांच्या सलग धडक कारवायांमुळे पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

सोनई पोलिसांच्या सलग धडक कारवायांमुळे पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारांचे धाबे दणाणले.

प्रतिनिधी /खेडले परमानंद , नेवासा

                घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस सोनई पोलीसांनी  मुद्देमालासह जेरबंद केले.

        दिनांक 08/08/2023 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास गणेश भिमपुरी गोसावी रा . कांगोणी रोड , गोसावी मळा सोनई यांचे राहत्या घराचा दरवाजा कुठल्यातरी हत्याराच्या साह्याने उचकाटुन घरफोड़ी  करुन त्यांच्या घरातील सॅमसंग कंपनीचे फ्रिज , भारत कंपनीची गॅस टाकी , गव्हाचे 50 कि.ग्रॅम वजनाचे 8 कट्टे , साखरेचा कट्टा , लहानमोठी स्टिलची व पितळाची भांडी तसेच फिर्यादी यांच्या शेजारी राहणारे सचिन लक्ष्मण माने यांचेही घरातील एच.पी. कंपनीच्या दोन गॅस टाक्या व पितळाची भांडी असा एकुण 35,400 / -रु . कि . चा मुद्देमाल चोरून नेला होता सदरच्या फिर्यादीवरुन सोनई पोलीस स्टेशन गु.र.नं. 361/2023 भा.द.वि. कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता . सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने स.पो.नि.माणिक चौधरी यांना खबऱ्या मार्फत गोपनीय बातमी मिळाली की , सदरचा गुन्हा हा संतोष दत्तु मोरे रा . पिसाळ मळा , सोनई याने व त्याच्या साथीदारांनी मिळुन केला असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्याने

 स पो नि चौधरी यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदार यांना माहीती देवुन आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगीतले . तपास पथकाने आरोपीचा राहत्या घरी जावुन शोध घेतला असता आरोपी हा त्याचे राहते घराजवळ मिळुन आला.

 त्याला ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन येथे आणुन त्याचेकडे त्यास विश्वासात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल करुन त्याचे सोबत त्यास गुन्हा करतेवेळी असेलेला साथीदाराचे नाव

    सागर चांगदेव शिंदे रा.सोनई असे सांगीतले.

      त्यानंतर सदर आरोपीस नमुद गुन्ह्यात अटक करून त्याचेकडे गुन्ह्यातील चोरी गेलेल्या मालाबाबत विचारपुस केली असता .

    त्याने चोरून नेलेला  

1) 2000 रु.कि.ची भारत गॅस कंपनीची लाल रंगाची गॅस टाकी . 2 ) 2200 / रु . कि . च्या अंगावर घेण्याच्या 11 चादरी किं.अं.जु.वा. 

3 ) 5000 / - रु.कि.चे सॅमसंग कंपनीचे राखाडी रंगाचे फ्रीज 

 4 ) 6,000 / - रु.कि.चे गव्हाचे 50 किलो ग्रॅ . वजनाचे 4 कट्टे किं.अं असा एकुण 15,200 / - रु.कि.चा मुद्देमाल काढुन दिल्याने तो जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलिस नाईक बाळासाहेब बाचकर हे करत आहेत.

       सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक अहमदनगर राकेश ओला , मा.डॉ.श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधिक्षक , श्रीरामपुर , मा .सुनिल पाटील सो . उपविभागीय पोलीस अधिकारी , शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणीक चौधरी , पोलीस उपनिरीक्षक राजु थोरात तसेच पोलीस नाईक बाळासाहेब बाचकर , पो कॉ अमोल जवरे , पो कॉ ज्ञानेश्वर आघाव , पोकॉ रवि गर्जे , पो कॉ निखील तमनर यांनी केली आहे .

      सोनई पोलिसांच्या एका मागोमाग एक धडक कारवयामुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.