पालकांच्या संमती शिवाय विवाह नोंदणी नको,कायद्यात बदल करा - देवेंद्र लांबे पा .
*पालकांच्या संमती शिवाय विवाह नोंदणी नको, कायद्यात बदल करा. – देवेंद्र लांबे पा.*
राहुरी येथील मराठा बहुउद्देशीय संस्था संचलित मराठा एकीकरण समितीच्या वतीने तहसीलदार श्री.नामदेव पाटील यांना पालकांच्या संमती शिवाय विवाह नोंदणी करू नये,विवाह नोंदणी कायद्यात बदल करावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.या प्रसंगी मराठा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक/अध्यक्ष देवेंद्र लांबे पा.,संदीप गाडे,सतीश घुले,अशोक तनपुरे,बलराज पाटील,अरुण निमसे,किरण पाटील रोहित नालकर उपस्थित होते.
या प्रसंगी देवेंद्र लांबे पा. म्हणाले कि, सध्या नगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात वयात आलेल्या मुला मुलींचे घर सोडून पलायन करून पालकांच्या परवानगी शिवाय विवाह नोंदणी संस्थे मध्ये नोंदणी करून विवाह केला जातो.वास्तविक पाहता मुला मुलींच्या पालकांनी लहान पणापासून तळहातावरच्या फोडाप्रमाणे मुलांना जपून संगोपन केलेले असते.त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक अडचणींवर मात करत ,वेळ प्रसंगी कर्ज काढून शिक्षण केले जाते.अशा परिस्थिती मुली स्वतःच्या कुटुंबातून नवख्या मुला सोबत कुणाला न सांगता पलायन करतात.पलायन करतांना कुटुंबातील सोने – रोकड घेवून पलायन करतात.
मुलगा किवा मुलीने घरातून पलायन केल्यामुळे त्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.तसेच समाजात वावरतांना अपमानित वागणूक दिली जाते. मुला मुलींच्या चुकांमुळे अनेक कुटुंब उध्वस्त झालेली आहेत.तसेच मुलगा किंवा मुलगी कुटुंब सोडून पलायन केल्यानंतर कायदेशीर रित्या पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिल्यामुळे पोलिस ठाण्यातील पोलिसांवर पलायनकेलेल्या मुला मुलीना शोधण्याचा अतिरिक्त ताण पडतो.सर्व कारणांचा विचार करता सज्ञान झालेल्या मुला-मुलींच्या विवाह नोदणी करतांना पालकांच्या संमती शिवाय विवाह नोंदणी केली जाणार नाही असा कायदा तयार करण्यात यावा अशी मागणी लांबे पा. यांनी म्हंटले आहे.
या प्रसंगी महेंद्र शेळके,अविनाश क्षीरसागर मराठा एकीकरणचे रवींद्र कदम,अण्णासाहेब तोडमल,शिवाजी थोरात,सुमित तनपुरे,देवेंद्र जाधव,विजय कोहकडे,कैलास तनपुरे,विनायक बाठे,मधुकर घाडगे,अशोक तुपे,सोमनाथ धुमाळ,अनिल पेरणे,दिनेश झावरे, शिवाजी तनपुरे,अनिल दरंदले,विलास थोरात,अभिजित काळे,किरण पाटील,अरुण निमसे,अशोक कदम,मेजर नामदेव वांढेकर,सागर ताकटे,जालिंदर कोहकडे संजय पोपळघट,शेखर सुडके,गणेश वांढेकर आदी उपस्थित होते.
--