महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा .

महात्मा फुले कृषी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा .

*महात्मा फुले कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*

*शरीर, मन व आत्म्याचे संतुलन राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा* *- अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे*

           आपल्या सर्वांच्या जीवनात योगाचे महत्व अनन्यसाधारण आहे. आपल्या दैनंदिन जीवनात योग व प्राणायामाचा अंगीकार केल्यास शारिरीक व मानसीक आरोग्य उत्तम राहते. शरीर, मन व आत्म्याचे संतुलन योग्य प्रकारे राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.

              महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाने विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानवरुन मार्गदर्शन करतांना डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. याप्रसंगी संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. विलास आवारी, आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजय पाटील, कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल, सावित्रिबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य श्री. अरुण तुपविहीरे व प्राथमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. विलास देशमुख उपस्थित होते.

         

          डॉ. साताप्पा खरबडे आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की आज संपूर्ण जगभर 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होत आहे. निरोगी वृध्दत्वासाठी योग अशी संकल्पना आजच्या योगदिवसाची असून वय वाढत असतांना शारिरीक व्याधी जडू नयेत, शरीराचा लवचीकपणा कायम रहावा म्हणुन योग करणे आवश्यक असल्याचे यावेळी ते म्हणाले. योगशिक्षक डॉ. बी.डी. पाटील व श्री. रविंद्र आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. सविनय शिंदे, डॉ. क्रांती पाटील विद्यार्थी सुंदरम घुले, कृष्णा पवार, विद्यार्थिनी कु. शिवानी शिंदे यांनी उत्तम प्रकारे योग व प्राणायाम प्रात्यक्षिके करुन घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विलास आवारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. जितेंद्र मेटकर यांनी मानले.

             या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक श्री. बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक श्री. मनोज बावा, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, पदव्युत्तर महाविद्यालय, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच सावित्रिबाई फुले प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व इंग्रजी माध्यमाच्या 500 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी तसेच प्राथमिक, माध्यमिक विद्यालयाचे सर्व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.