जल जीवन मिशन नसून कमिशन योजना ;राहुरीत 22 जूनला सरकारच्या मनमानी धोरणा विरोधात आंदोलन होणार
*- जल जीवन 'मिशन' नसून 'कमिशन' योजना*
*-राहुरीत २२ जूनला सरकारच्या मनमानी धोरणाविरोधात आंदोलन होणार*

तहसील कार्यालय, राहुरी, जिल्हा अ.नगर सोमवार, २२ जून २०२६ रोजी "जलजीवन मिशन योजनेचे अपूर्ण व निकृष्ट कामांविरोधात तसेच तत्काळ पीण्याचे पाणी उपलब्ध करणे आणि सरकारच्या मनमानी धोरणा विरोधात ठरवलेल्या आंदोलनाचे निवेदन आज तहसीलदार डॉ . अमित पवार, राहुरी व गटविकास अधिकारी मा. तायडे, उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा राहुरी यांना सादर करण्यात आले. या वेळेस अनेक नागरिक, कार्यकर्ते निवेदन सादर करण्यासाठी..जमले होते. कौठेवाडी चिंचाळा, वरशिदे, सात्रळ, बुळे पठार, कोळेवाडी येथील पाणी प्रश्न बाबत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंते प्रशांत जयभाये यांच्याही निवेदन सादर करून चर्चा झाली. यांनी त्यांच्या पातळीवर असलेले स्थानिक प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्यातील २५००० योजना अपूर्ण आहेत. ३१कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे. गरज नसतांना ३५हजार कोटी रुपये कुंभ मेळा वर खर्च केला जाणार आहे तसेच नको असलेले आणि जनतेचा तीव्र विरोध असले नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गावर १ लाख कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. आणि जलजीवन मिशन करता निधी नसल्याचे शासन प्रशासनाकडून सांगितले जात आहे. हे सरकार ढोंग करत आहे. जलजीवन मिशन योजनेच्या नावाखाली भाजप सरकारकडून नागरिकांची मोठी फसवणूक सुरू असून ठेकेदार आणि पक्ष पुढाऱ्यांचे खिसे गरम करण्यासाठी या योजनेचा घाट घातला आहे. पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली भावनिक बनवून क्रूर चेष्ठा भाजप सरकार करत आहे. ही योजना मिशन नसून कमिशन योजना झाली असल्याचा आंदोलनाच्या संयोजकाांनी आरोप केला आहे. मान्सून लांबला आहे. दुष्काळ वाढत आहे. शासनाणे कुठलीही पूर्वतयारी किंवा उपाययोजना केलेली नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे. संविधानाने नागरिकांना दिलेला पाण्याचा मूलभूत हक्क जनतेला उपलब्ध करून देण्यात निष्क्रिय ठरलेल्या सरकारच्या विरोधात दिनांक २२ जून २०२६ रोजी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन आंदोलकांच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी निवेदन देण्यासाठी देवराम जाधव, कैलास बुळे, निखिल जाधव, वर्षाताई बाचकर, संदीप कोकाटे, पंकज पलघडमल, सुभाष नंदकर, आदित्य साळवे, युवराज मधे, किसन काळे, विवेक तळपे, बंडू वायळ, उस्मान शेख, सचिन विधाते, खेमा काळे.मधुकर विधाते, पंकज पलघडमाल, सोमा काळे, मुरलीधर काळे या कार्यकर्यांसह नागरिकही उपस्थित होते .








