तांदुळवाडी स्कुल बस अपघाताची तहसिलदार अमित पवार यांनी घेतली दखल ; RTO विभागाच्या डोळेझाकपणावर नागरिकांमध्ये संताप .
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राहुरी प्रशासनाचे मोठे पाऊल!
तांदुळवाडी (ता. राहुरी) येथे शालेय बसचा स्टेअरिंग रॉड तुटून झालेल्या अपघाताची माननीय तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांनी तातडीने दखल घेतली आहे. तालुक्यातील सर्व शालेय वाहनांची आणि वाहन चालकांची तातडीने तपासणी करण्याचे कडक आदेश त्यांनी दिले आहेत.
शासकीय आदेशातील मुख्य मुद्दे:
तातडीने मोहीम:
राहुरी तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय व खाजगी शाळांमधील बसेस, व्हॅन आणि ऑटो रिक्षांची RTO च्या संयुक्त विद्यमाने तपासणी होणार.
तांत्रिक निकष तपासणी:
वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग, ब्रेक यंत्रणा, स्टिअरिंग रॉड, टायर आणि विमा कागदपत्रांची कसून चौकशी केली जाईल.
चालकांची पात्रता व आरोग्य:
वाहन चालकाचा परवाना, चारित्र्य पडताळणी, व्यसनमुक्ती आणि दृष्टी (Medical Fitness) तपासली जाणार.
कडक कारवाई:
नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर तात्काळ बंदी घालून संबंधित शाळा प्रशासन व चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश.
विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या व्हाटसअप ग्रुपवर RTO कार्यालयातून बाहेर येण्यापासून ते पुन्हा कार्यालयात जाईपर्यंत सर्व सुचना मिळत असल्याने स्कुलबस सहसा RTO च्या विळख्यात सापडत नसल्याने विद्यार्थ्यांची वाहतूक करणारे चालक स्वतःला धन्य मानतांना दिसून येतात . परंतु अशा अनफिटनेस असलेल्या वाहनांवर तत्काळ कारवाई होणे गरजेचे आहे .
अपघाताची भीषणता ओळखून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत तत्परतेने आणि प्राधान्याने ही कडक पावले उचलल्याबद्दल तहसीलदार (राहुरी) यांचे तालुक्यातील सर्व नागरिक आणि पालकांच्या वतीने आभार मानन्यात येत आहे .








