नंदूरबारच्या विद्यार्थ्यांनी 500 ग्रॅम रेडी - टू - युज कडुलिंब बियांच्या पावडरचे नाविन्यपूर्ण उत्पादन केले विकसीत .

नंदूरबारच्या विद्यार्थ्यांनी 500 ग्रॅम रेडी - टू - युज कडुलिंब बियांच्या पावडरचे नाविन्यपूर्ण उत्पादन केले विकसीत .

*'किडींवर मात करण्याचा सोपा, स्मार्ट आणि सेंद्रिय मार्ग'*

*शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबारच्या विद्यार्थ्यांचे 500 ग्रॅम 'रेडी-टू-यूज' कडुलिंब बियांच्या पावडरचे नाविन्यपूर्ण उत्पादन"*

 

*महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत असलेल्या शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथील शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी अनुभवा आधारित प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत [ELP module] सेंद्रिय शेतीसाठी एक शेतकरी-केंद्रित नाविन्यपूर्ण उपाय विकसित केला आहे.*

 

विद्यार्थ्यांनी *500 ग्रॅम वजनाचे, कडुलिंब बियांच्या पावडरचे पॅकेट* तयार केले आहे. ज्यापासून थेट *5% कडुलिंब अर्क* फवारणीसाठी बनवता येतो. कोणतीही मोजमापाची अडचण नाही.

 

*यातील नाविन्य काय?*

1. *शेतकरी-सुलभ*: पूर्ण 500 ग्रॅम पावडर 10 लिटर पाण्यात मिसळा, रात्रभर मुरवा= 5% अर्क तयार. हिशोब नाही. चूक नाही. फक्त मिसळा, मुरवा, वस्त्रगाळ करा, फवारा. संरक्षण करा.

2. *100% सेंद्रिय व सुरक्षित*: पूर्णपणे नैसर्गिक, रसायनमुक्त. पिके, जमीन आणि मधमाशीसारख्या मित्र कीटकांसाठी सुरक्षित.

3. *विद्यार्थी निर्मित*: महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी बनवले उत्पादन.

 

आदिवासी पट्ट्यातील नंदुरबारच्या शेतकऱ्यांना रासायनिक कीडनाशकांवरील अवलंबित्व कमी करून शाश्वत शेतीकडे नेणे, हा यामागील उद्देश आहे.

या नाविन्यपूर्ण 500 ग्रॅम 'रेडी-टू-यूज' कडुलिंब बी पावडर उत्पादनाचे प्रात्यक्षिक 

शासकीय कृषि महाविद्यालय, नंदुरबार येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ. यू. बी. होले यांच्या प्रेरणादायी नेतृत्व, मार्गदर्शन व संकल्पनेतून आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या या शेतकरी-केंद्रित उत्पादनाचे सादरीकरण करताना डॉ. होले यांनी सेंद्रिय शेती, सुरक्षित अन्न उत्पादन, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत कीड व्यवस्थापनासाठी अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. विद्यार्थ्यांनी संशोधनाधारित तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून उद्योजकतेकडे वाटचाल करावी, असेही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

 

या उपक्रमाचे नियोजन व तांत्रिक मार्गदर्शन कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक तथा ELP मॉड्यूल प्रभारी डॉ. के. व्ही. देशमुख यांनी केले. तर श्री. प्रसाद गांगुर्डे कृषि सहाय्यक यांचे सहकार्य लाभले.

 

_"प्रयोगशाळेतून थेट शेतात"_ – हीच ELP ची ओळख.

 

जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळा, 

कीटकशास्त्र विभाग, 

शासकीय कृषि महाविद्यालय,

नंदुरबार.