*अहिल्यानगर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीबाबत शिक्षण विभागाकडे वारंवार तक्रार करूनही कारवाई नाही ; तक्रार दाराची दिशाभूला करून प्रकरण दडपण्याचा होतोय प्रयत्न.*
अहिल्यानगर जिल्ह्यातील बोगस शिक्षक भरतीबाबत वारंवार बातम्या प्रसिद्ध होत असूनही याबाबत कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही . बोगस शिक्षक भरती बाबत नागपूर प्रमाणे या जिल्यातही कारवाई करून गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती परंतू या तक्रारीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करून तक्रारदाराची नियोजितपणे दिशाभूल करण्याचे काम शिक्षण विभाग करत असल्याचे दिसून येत आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अंतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक शाळेमधील चार शिक्षकांच्या असलेल्या बोगस मान्यता व त्यांना देण्यात आलेले वेतन दुबार पद्धतीने आकारणी झालेली असल्याने राहुरी तालुका प्रहार संघटना उपाध्यक्ष यांनी शिक्षणाधिकारी व शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी तक्रार करून कोणत्याही प्रकारे कार्यवाही झालेली नाही . सदर चार प्राथमिक शिक्षकांच्या बाबतीत शिक्षण उपसंचालक यांनी सुनावणी घेऊन संबंधित तक्रारदारास त्रयस्त व्यक्ती करून निर्णय निकाली काढण्यात आला . तक्रारदार हा संस्थेच्या निगडीतच असावा असे शिक्षण विभागाचे संचालक व उपसंचालक यांचे म्हणणे होते . परंतू तक्रारदार हा राहुरी सहकारी साखर कारखाना या संस्थेचा सभासद असून या कारखान्याच्या सलग्नच शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था आहे तरीही तक्रारदारास तत्रस्थ व्यक्ती करून अर्ज निकाली काढण्यात आला .
ऑगस्ट 2018 मधील शासन निर्णयाप्रमाणे सदर मान्यता रद्द करणे कामी सुनावणी घेतली परंतु सुनावणीचा फक्त बनाव करून संबंधितांकडून सदर फाईल गरज नसलेल्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून तक्रारदाराची दिशाभूल केली . त्यासंदर्भात माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाचे अध्यक्ष यांनी सदर निर्णय हा अंतिम स्वरूपात शिक्षण उपसंचालक पुणे विभाग पुणे यांनी घेणे गरजेचे आहे असे सांगून सदर मान्यता चुकीच्या कशा आहेत त्याबाबतचे निर्देश तपासणी करण्यासाठी लेखी पत्राने ( जा . क्र. पुविमं / अस्वीस / 2025 / 9262 ) दिनांक 05 / 12/025 रोजी कळविले होते . परंतु त्याचा अद्याप पर्यंत निकाल दिलेला नाही तसेच त्यात संस्थेतील जुनिअर कॉलेज विभागाकडे अनेक बोगस मान्यता दिलेल्या असून अर्धवेळच्या पूर्णवेळ करताना पोर्टलमार्फत देण्याच्या ऐवजी त्याही शिक्षण उपसंचालक पुणे यांनी 2025 रोजी देऊन अनियमितता केलेली आहे . तसेच बेलापूर एज्युकेशन सोसायटी बेलापूर यांच्या संस्थेतील तीन बोगस मान्यता कोर्टाच्या निर्णयामध्ये कोणत्याही प्रकारच्या गाईडलाईन नसताना अपहार करून देण्यात आलेले आहे . या सर्व बाबींची चौकशी न करता परस्पर प्रकरण दडपण्यात येत आहे .
बंडगार्डन पोलीस स्टेशनला दिनांक 25 / 05 /2026 रोजी तक्रार देण्यात आलेली होती परंतू चौकशी करण्याऐवजी सदर तक्रार आयुक्तांकडे पाठवण्यात आली . एखाद्या तक्रारीची चौकशी नागपूर पोलीस स्टेशन करू शकते परंतु बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे का करीत नाही ? याबाबत ही शंका उत्पन्न होत आहे . अशा सर्व बाबींचा अंधारात फसवणूक करून फायदा घेण्याचे काम शिक्षण विभागातील अधिकारी करीत आहे . यातील एक अधिकारी ज्यांनी यांना शालार्थ आयडी दिले ते लाच लुचपत विभागाकडून नुकतेच पकडण्यात आले आहे . त्यांचीही यामध्ये चौकशी होणे गरजेचे होते परंतु सर्व प्रकरण पाठीशी घालण्याचे काम वरिष्ठ कार्यालय करीत आहे .ही बाब अतिशय खेदजनक असून या सर्वांचा मास्टर माईंड कोण आहे हे शोधून अहिल्यानगर मधील बोगस शिक्षक भर्तीचा पर्दाफाश होईल का ? याकडे सार्वांचे लक्ष लागून आहे .
अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी कार्यालय व शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे या ठिकाणी शालेय कर्मचारी शाळेतील कामकाज सोडून या दोन्ही कार्यालयात उपस्थित राहतात . हे कर्मचारी लिपीक नसून ते शाळा सोडून या कार्यालयात जातात. दोन्ही कार्यालयातील सीसी टीव्ही कॅमेरे तपासले तर हे ठरावीक कर्मचारी या शिक्षण विभागाच्या कार्यालयात लुडबूड का करतात ? हे शोधणेही गरजेचे आहे .








