अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुभमंगल कार्यालय या ठिकाणी दिव्यांगा करिता पिठाची गिरणी व तीन चाकी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्रीरामपूर : दिव्यांगांच्या सामाजिक पुनर्वासनाकरता आणि दिव्यांगांना सामाजिक अभिसरण चळवळीमध्ये समाविष्ट करण्यासाठी नेहमीच संस्था आणि संघटना श्री संजय साळवे आणि वर्षा गायकवाड मॅडम या लक्ष्मी पार्वतीच्या जोडी च्या मार्गदर्शनाखाली सातत्यपूर्ण विविध सामाजिक उपक्रम श्रीरामपूरमध्ये राबवित आहेत.आज दिव्यांगांच्या आर्थिक पुनर्वसनाकरता आणि स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पिठाची गिरणी आणि तीन चाकी सायकल वाटप करण्यात येत आहे.शेती महामंडळाची जमीन प्रत्येक ग्रामपंचायतीला मोफत देण्याची योजना महसूल व दुग्धविकास मंत्री मा.ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राबविण्यात येणार आहे त्या जागेवर दिव्यांगाकरिता विशेष घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. त्याचबरोबर महसूलमंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत दिव्यांगांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आसान दिव्यांग संघटना पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येईल.असे आश्वासन जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी जाहीरपणे दिले
अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शुभमंगल कार्यालय या ठिकाणी दिव्यांगा करिता पिठाची गिरणी व तीन चाकी सायकल वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध अंध गायक खोकर शाखेचे अध्यक्ष विकास साळवे यांच्या सुमधुर गीताने करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तनगर ग्रामपंचायत च्या सरपंच माननीय सौ.सारिका कुंकूलोळ होत्या.तर कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती मा.बाबासाहेब दिघे, दत्तनगर माजी सरपंच सुनील शिरसाठ,बेलापूर ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक भाई शेख, शिक्षकेतर संघटनेचे दिनेश तरटे, अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी वीरेश रंधे, किरण ढोणे, सुरेखा वाघ, वंदना उबाळे या दिव्यांग व्यक्तींना पिठाची गिरणी स्वयंरोजगारासाठी देण्यात आली. त्याचबरोबर बाबा साहेब लाटे व सुमन सोनवणे यांना तीन चाकी सायकल मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.कार्यक्रमासाठी विजय कुऱ्हे यांचे विशेष सहकार्य लाभले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताक भाई तांबोळी,उपाध्यक्ष सुनील कानडे, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, खजिनदार सौ.साधना चुडीवाल,दत्तनगर शाखाध्यक्ष सौ विमल जाधव,खोकर शाखाध्यक्ष विकास साळवे, जनार्दन पुजारी, विलास साळवे,गंगाधर सोमवंशी, दत्तात्रय चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.