*मुंबई येथे प्रथमच “महात्मा दिन” उत्साहात साजरा - सचिन भाऊसाहेब गुलदगड*

*मुंबई येथे प्रथमच “महात्मा दिन” उत्साहात साजरा - सचिन भाऊसाहेब गुलदगड*

*मुंबई- श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्यच्यावतीने सुरु करण्यात आलेला “महात्मा दिन ११ मे” महाराष्ट्राबरोबर ईतर राज्यांतही समाजोपयोगी कार्यक्रम राबवुन उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला*. 

  *मुंबई मध्ये मुलुंड येथे श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्यच्या वतीने मुलुंड हायस्कूल हॅालमध्ये महात्मा दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतु गोपीनाथ वसंत लोखंडे होते, तसेच संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड,के.आर. चौधरी,संघाचे राज्य सचिव सुनिल गुलदगड, सावित्री राष्ट्रीय समितीच्या उपाध्यक्षा लताताई खाडे, डॅा.ढोने,ज्ञानेश्वर महाजन,अमोल वाकचौरे,गिरीष सुर्यवंशी,पी. एस. आय. वाल्मिक महाजन,संजय गुलदगड,राजेन्द्र कर्ने,सुधीर चौधरी,सुभाष गुलदगड ,दिपक जगझाप ,लक्ष्मण माळी ,दत्तात्रय देवकर,आदी मान्यवर उपस्थित होते.*

      *रावबहादुर नारायण मेघाजी लोखंडे यांचे पणतु गोपीनाथ वसंत लोखंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलतांना म्हणाले की, महात्मा फुले यांचे कार्य जगाला सर्वश्रुतच आहे.स्त्री-शुद्र-अतीशुद्र समाजाच्या उन्नतीसाठी सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले ज्या तन्मयतेने झटत होते, त्यासाठी त्यांनी जे कष्ट उपसले होते,त्यामोबदल्यात महाराष्ट्रातील विशेषतः पुण्यातील ब्राम्हणशाहीने त्यांचा अतोनात छळ व अपमान केला होता.त्यामुळे सत्यशोधक कार्यकर्त्यांमध्ये व बहुजनांमध्ये त्यांचा आदर दुनावला होता. मांडवीच्या रघुनाथ सभागृहात आपल्या उद्धारकर्त्या महामानवाचे ऋण फेडण्यासाठी गरीब व कष्टकरी जनतेने मोठ्या संख्येने आणि उत्स्फुर्तपणे जमून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विडा उचलला होता. मुंबईकर सत्यशोधक कार्यकर्ते व नारायण मेघाजी लोखंडे यांच्या आमंत्रणांवरुन ज्योतीबा फुले मुंबईला आले होते,तेव्हा मुंबईतील कोळीवाडा येथील जनतेच्या वतीने ११ मे १८८८ रोजी ज्योतिबा फुलेंना "महात्मा" पदवीने गौरविण्यात आले.त्यादिवसापासुन आपणासर्वांना ज्योतिबा फुले "महात्मा फुले" नावाने परिचित झाले*

  *यावेळी सौ. लताताई खाडे म्हणाल्या की महात्मा पदवीने ११ मे १८८८ मध्ये मुंबईच्या कोळीवाडा येथे ज्योतीबा फुलेंना युगप्रवर्तक कार्याबद्दल जनतेने महात्मा पदवीने गौरविण्यात आले,आज त्या घटनेस १३४ वर्षे होत आहेत. या घटनेचा वेध घेऊन श्री. संत सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी गुलदगड आणि श्री संत सावता माळी युवक संघ,महाराष्ट्र राज्य या संघटनेने देशभर सलग ७ वर्ष विविध उपक्रम घेऊन हा विशेष दिन साजरा केला तसेच या दिवसास “महात्मा दिन” असे नाव दिले आणि युवा पिढीसमोर फुलेदाम्पत्याचे कार्य मांडत आहेत व भावी पिढीचे संघटन उत्तमरित्या करत आहेत त्याबद्दल सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र व सावित्रीच्या लेकींच्या वतीने त्यांचे मी अभिनंदन करुन भावी कार्यास शुभेच्छा देते व त्यांनी असेच उपक्रम घेऊन कार्य करत राहो आम्ही सावित्री शक्तीपीठ बरोबरच असु*.

  *यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी देशभरातील महात्मा दिन साजरा करणाऱ्या श्री. संत सावता माळी युवक संघाच्या सर्व पदाधिकार्यांचे व फुले प्रेमींचे अभिनंदन केले व महात्मा दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या*.

  *या कार्यक्रमास मुंबई, उपनगर व राज्यांतुन अनेक मंडळी उपस्थित होते,यावेळी सर्वांचे आभार संघाचे राज्याचे सचिव सुनिल गुलदगड यांनी मानले*