एकविरा फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा परीक्षेसाठीची लायब्ररी सुरू...

संगमनेर ( प्रतिनिधी ) :- कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील तरुण व तरुणींना स्पर्धा परीक्षासाठी यशोधन जनसंपर्क कार्यालयात अद्यावत लायब्ररी सुरू करण्यात आली असून या लायब्ररीचा शुभारंभ लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. जयश्रीताई थोरात, प्रा. डॉ. वृषाली साबळे, श्रीराम कुऱ्हे, सुरभी मोरे, सुरभी असोपा व आदि उपस्थित होते.
यशोधन कार्यालयात या लायब्ररीचा स्वतंत्र कक्ष असून सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते 5 या वेळेत विद्यार्थ्यांना आपल्या आय कार्ड वर पुस्तके मिळणार आहेत. एकविरा च्या वतीने सुरू झालेल्या ग्रंथालयात तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, एमपीएससी, युपीएससी, नेट, सेट, बँकिंग भरती, मेडिकल, इंजीनियरिंग सीईटी, नीट यांसह विविध परीक्षांसाठीचे पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.