विद्यार्थांनी कलाक्षेत्रात करीयर करावे - सिनेपत्रकार भगवान राऊत

विद्यार्थांनी कलाक्षेत्रात करीयर करावे - सिनेपत्रकार भगवान राऊत

विद्यार्थ्यांनी कलाक्षेत्रात करिअर करावे -सिनेपत्रकार भगवान राऊत

 

भारत भालेराव

ग्रामीण प्रतिनिधी,

 

आव्हाणे बु: दि.28रोजी आबासाहेब काकडे विद्यालय, शेवगाव येथे इको फ्रेंडली राख्या बनवा कार्यशाळेचे इयत्ता 5 वी ते इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेतील निवडक राख्यांचे प्रदर्शन कलादालनात भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन सिनेपत्रकार भगवान राऊत, अहमदनगर यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणातील विविध घटक, टाकाऊ वस्तु यांच्यापासून विद्यार्थ्यांनी कल्पकतेने बनवलेल्या राख्या पाहून राऊत भारावून गेले आणि त्यांना त्यांच्या शालेय जीवनातील विविध उपक्रमांची आठवण झाली. अतिशय सुंदर व कल्पक बनवलेल्या राख्याबद्दल त्यांनी बालकलाकारांचे कौतुक केले. 

             उद्घाटनाच्या सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती,कर्मयोगी आबासाहेब व स्वर्गीय निर्मलाताई यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विद्यालयातील नव उपक्रमांतर्गत 'मी कसा घडलो' या विषयावर या विद्यालयाचे माजी विद्यार्थी सिनेपत्रकार भगवान राऊत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यामधून विविध विषयांवर विद्यार्थ्यांना बोलते करून लोककला, नाट्य, सिनेमा, चित्रकला, हस्तकला, क्रीडा पत्रकारिता इ. विषयांवर प्रश्न उत्तरांचा संवाद रंगला आणि विद्यार्थी, शिक्षक यामध्ये मंत्रमुग्ध झाले. विविध विद्यार्थ्यांच्या यावेळी मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखत हा प्रकार आज विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.

विद्यार्थ्यांना विद्यालयाचे कलाशिक्षक शितलकुमार गोरे यांनी विविध प्रकारच्या राख्या कार्यशाळेमध्ये बनवून दाखवल्या 285 विद्यार्थी या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले.

    प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते, उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, देहाडराय, रामदास पांढरे, सुरज लबडे, लक्ष्मण नांगरे, रागिनी लबडे, भाग्यश्री गडाख, प्रतिमा कुसळकर, स्मिता खाडे, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ज्ञानेश्वर गरड यांनी

केले.